न्यूयॉर्क : तुम्ही जर WWE आणि त्यातल्या त्यात रेसलर अंडरटेकरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अंडरटेकरने WWE मधून रिटायरमेंट घेतली हे सर्वांनाच माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण त्याच्या चाहत्यांना हे वाचून आनंद होणार आहे की, पुढील वर्षी तो पुनरागमन करू शकतो. एप्रिल महिन्यात त्याने रिटायरमेंटची घोषणा केली होती. तो आता जानेवारी २०१८ मध्ये RAW च्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त रिंगमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत मायकल शॉन सुद्धा बघायला मिळणार आहे. 


पण अंडरटेकर केवळ या स्पेशल इव्हेंटसाठी रिंगमध्ये उतरणार कि पुढेही फाईट खेळत राहणार हे स्पष्ट होऊ शकलं नाहीये. अनेक वर्षांपासून WWE रिंगमध्ये प्रेक्षकांचा फेव्हरेट राहिलेल्या अंडरटेकरने एप्रिलमध्ये रिटायरमेंट घेतली होती. रोमन रेंसच्या हातून कुस्ती हरल्यानंतर त्याने या खेळाला निरोप दिला होता.  


WWE ने घोषणा केली की, ‘सोमवारी रात्री रॉ आणि स्मॅकडाऊन दोन्हीचे सुपरस्टार्स बार्कले सेंटर आणि मॅनहॅटन सेंटरमध्ये येतील. रॉच्या पहिल्या एपिसोडमध्ये शॉन मायकल्स आणि अंडरटेकर दोघेही दिसतील’.


अंडरटेकरने २५ वेळा प्रतिष्ठित रेसलमेनिया फाईटमध्ये भाग घेतलाय. त्यात त्याचा जिंकण्याचा रेकॉर्ड २३-२ असा राहिला. ५२ वर्षीय अंडरटेकरची WWE फाईटमध्ये एन्ट्रीही कमालीची होती. त्यासाठीच तो लोकप्रिय होता.