मुंबई : ९०च्या दशकातील मुलांचा फेव्हरिट डेडमॅन अंडरटेकर WWEमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. WWEच्या रिंगमध्ये पुन्हा एकदा येण्यासाठी अंडरटेकरनं पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली असल्याची माहिती आहे. तसंच अंडरटेकर ब्रुकलिन म्हणजेच समरस्लॅम पे पर व्ह्यू कार्यक्रमातही दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. निवृत्त व्हायच्या आधी बराच काळ अंडरटेकर हा सगळ्यात मोठ्या पे पर व्ह्यूचा भाग होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेसलमेनिया ३३मधील अखेरच्या सामन्यात रोमन रेंसकडून अंडरटेकरला हार पत्करावी लागली होती. यानंतर त्यानं WWEमधून निवृत्ती घेतली होती. रेसलमेनियाच्या मुख्य स्पर्धेत अंडरटेकर आणि रोमन रेंस यांच्यात सामना रंगला. मात्र या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. रेसलमेनियामध्ये अंडरटेकरचा रेकॉर्ड २३-२ इतका राहिला. या पराभवानंतर अंडरटेकरने डब्ल्यूडब्ल्यूईमधून निवृत्ती घेतलीये.


तब्बल २७ वर्षानंतर त्याची डब्ल्यूडब्ल्यूईमधील कारकीर्द अखेर संपतेय. या कारकिर्दीत त्याच्यावर चाहत्यांनी मनापासून प्रेम केले.