राफएल नदालची अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक
स्पेनच्या राफएल नदालनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारलीय. नदालने अर्जंटिनाच्या जुआन मार्टिन डेलपोत्रोवर 4-6, 6-0, 6-3 आणि 6-2 अशा चार सेटमध्ये विजय मिळवलाय.
न्यूयॉर्क : स्पेनच्या राफएल नदालनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारलीय. नदालने अर्जंटिनाच्या जुआन मार्टिन डेलपोत्रोवर 4-6, 6-0, 6-3 आणि 6-2 अशा चार सेटमध्ये विजय मिळवलाय.
दोन वेळेस अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या राफएल नदालची फायनलमध्ये गाठ दक्षिण आफ्रिकेच्या केविन एंडरसनशी पडणार आहे. रविवारी ही फायनल रंगणार आहे.
उपांत्य फेरीत राफेलने अर्जेंटिनाच्या 24 व्या मानांकित युआन मार्टिन डेल पोत्रोवर 4-6, 6-0, 6-3, 6-2 असा विजय मिळवला. डेल पोत्रोनं उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला मात दिली होती आणि यापूर्वी 2009 मध्येही त्याने नदाल व फेडरर यांना लागोपाठच्या सामन्यात हरवून यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते. नदालने 2009 मधील सामन्यात पराभवाचे पुरेपूर उट्टे काढले.