USA vs CAN: टी 20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून पहिला सामना यजमान अमेरिका विरूद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळवला गेला. हा सामना अमेरिकेतील डॅलसच्या क्रिकेट स्टेडियमवर झाला. यावेळी दोन्ही टीमचा हा T-20 वर्ल्डकप पदार्पण सामना होता. कॅनडाने प्रथम फलंदाजी करत 195 रन्सचं लक्ष्य अमेरिकेला दिलं होतं. यावेळी अमेरिकेच्या टीमने अवघ्या 14 चेंडू बाकी असताना केवळ 3 विकेट्स  गमावून पूर्ण केलं. यावेळी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत अमेरिकेने चांगली सुरुवात केली. यावेळी ॲरॉन जोन्स हा अमेरिकेसाठी विजयाचा खरा शिल्पकार ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडाने T20 वर्ल्डकपच्या ओपनिंग सामन्यात एक रेकॉर्ड केला आणि त्याच सामन्यात आणखी एक विक्रम रचून अमेरिकेने वर्ल्डकप स्पर्धेचा श्रीगणेशा केला आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये पदार्पण करणाऱ्या दोन्ही टीममध्ये हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळाला. प्रथम खेळताना कॅनडाने 20 ओव्हर्समध्ये 194 रन्स करून सर्वाधिक स्कोर करणारा असोसिएट राष्ट्र बनला. अमेरिकेने टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच विक्रमी लक्ष्याचा पाठलाग केला. याआधी, कधीही त्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 195 रन्सचा इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला नव्हता.


कॅनडाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यावेळी अमेरिकेच्या टीमची पहिली विकेट पडली तेव्हा त्यांच्यावर दडपण आलं होतं. मात्र टीमचा उपकर्णधार ॲरॉन जोन्स आणि अँड्र्यू गूस यांनी मिळून डाव सावरला. त्यानंतर सामन्याचे संपूर्ण चित्रच पालटलं. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 131 रन्सची स्फोटक पार्टनरशिप करत अमेरिकेला विजय मिळवून दिला.


ॲरॉन जोन्सची नाबाद खेळी


ॲरॉन जोन्सच्या 94 धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर अमेरिकेने कॅनडाचा पराभव करून 2024 च्या टी 20 वर्ल्डकपमधील आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. कॅनडाच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना अँड्र्यू गॉस (65 धावा) आणि ॲरॉन जोन्सच्या 40 चेंडूत खेळलेल्या नाबाद 94 रन्सच्या खेळीच्या जोरावर अमेरिकेने 17.4 षटकांत 3 विकेट्स गमावून 197 रन्स करून विजय मिळवला. 


ॲरॉन जोन्सने झंझावाती खेळी केली. यावेळी त्याने 10 षटकार आणि 4 चौकार लगावले. नवनीत धालीवाल (61) आणि ॲरॉन जॉन्सन (31) यांनी कॅनडाला आक्रमक सुरुवात करून दिली. यानंतर निकोलस किर्टनने 31 चेंडूत 51 रन्स करत आव्हानात्मक स्कोर गाठला. मात्र तरीही त्यांना अमेरिकेकडून पराभव स्विकारावा लागला.