IND VS UAE : सध्या यूएईमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 एशिया कप 2024 (ACC U19 Asia Cup 2024) स्पर्धेत 4 डिसेंबर रोजी भारत विरुद्ध यूएई यांच्यात सामना पार पडला. या शारजाह स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताकडून 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने यूएई विरुद्ध वादळी खेळी केली. यासह सामना जिंकून टीम इंडिया (Team India) आता थेट सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 (IPL 2025) साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये बिहारचा 13 वर्षीय क्रिकेटरवर कोट्यवधींची बोली लागली होती. अखेर त्याला राजस्थानने खरेदी केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारजाह येथे बुधवारी झालेल्या सामन्यात यूएईच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या यूएई संघाला भारतीय गोलंदाजांनी 44 ओव्हरमध्ये ऑल आउट केले. यूएईने 137 धावा करून भारताला विजयसाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाला हा सामना कमीत कमी ओव्हर्समध्ये जिंकायचा होता. त्यामुळे भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे दोघे मैदानात आले. यावेळी दोघांनी एकही विकेट न गमावता विस्फोटक फलंदाजी केली. यात आयुष म्हात्रेने 51 बॉलमध्ये 67 धावा केल्या तर सूर्यवंशीने अवघ्या 46 बॉलमध्ये नाबाद 76 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने 6 षटकार आणि 3 चौकार लगावले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 165.22 इतका होता. 


हेही वाचा : फक्त विनोद कांबळीच नाही तर व्यसनामुळे 'या' 4 क्रिकेटर्सचंही करिअर उध्वस्त झालंय



भारत सेमी फायनलमध्ये पोहोचला : 


यूएईने भारताला विजयासाठी दिलेलं आव्हान अवघ्या 16.1 ओव्हरमध्ये पूर्ण झालं. त्यामुळे टीम इंडियाला थेट सेमी फायनलचं तिकीट मिळालं आहे. भारतासोबत सेमी फायनलमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे संघ सुद्धा आहेत. आशिया कपचा पहिला सेमी फायनल सामना हा 6 डिसेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात होईल. तर त्याच दिवशी दुसरा सेमी फायनल सामना हा भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. 


कोण आहे वैभव सूर्यवंशी? 


आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे वय 13 वर्षे असून त्याचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. वैभव सूर्यवंशी या ऑल राउंडर खेळाडूने बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन चार दिवसीय रेड-बॉल क्रिकेट सामने खेळणाऱ्या भारताच्या अंडर-19 संघाचा वैभव देखील भाग होता. यावेळी त्याने शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वैभवने आतपर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5 सामने खेळून 100 धावा केल्या असून गोलंदाजी करताना 1 विकेट सुद्धा मिळवली आहे. वैभव सूर्यवंशीने मेगा ऑक्शनमध्ये त्याचं नाव 30 लाखांच्या बेस प्राईजवर नोंदवल होतं. हा युवा खेळाडू जेव्हा ऑक्शनमध्ये आला तेव्हा त्या खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारून वैभव सूर्यवंशीवर 1.10 कोटींची बोली लावून त्याला खरेदी केले. त्यामुळे वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमधील सर्वात तरुण करोडपती खेळाडू ठरला आहे.