भारतीय टीमच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत वेंकटेश प्रसाद
भारताचे माजी क्रिकेटर आणि ज्युनियर नॅशनल टीमचे चीफ सिलेक्टर वेंकटेश प्रसादरही आता प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरलेत.
नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटर आणि ज्युनियर नॅशनल टीमचे चीफ सिलेक्टर वेंकटेश प्रसादरही आता प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरलेत.
मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या पदासाठी दावा केलाय. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री आणि प्रसाद या शर्यतीत आहेत.
नुकताच रवी शास्त्री यांनी प्रशिक्षपदसाठी अर्ज दाखल केला. वेंकटेश प्रसाद यांनी भारतीय टीमकडून ३३ टेस्ट आणि १६२ वनडे खेळल्यात.
आता प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत वेंकटेश प्रसाद, सेहवाग, रवी शास्त्री, लालचंद राजपूत, डोडा नरेश ही नावे आहेत. दरम्यान, प्रसाद यांनी प्रशिक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट केलेले नाहीये.