मुंबई : विदर्भानं रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर आता बीसीसीआयनं इराणी ट्रॉफीसाठी शेष भारत टीमची घोषणा केली आहे. १२ ते १६ नोव्हेंबरदरम्यान विदर्भ आणि शेष भारतमध्ये इराणी ट्रॉफीची मॅच होईल. अजिंक्य रहाणेला शेष भारत टीमचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. विदर्भनं रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये सौराष्ट्रला हरवून सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. इराणी ट्रॉफीमध्ये रणजी जिंकणाऱ्या टीमचा मुकाबला शेष भारत टीमशी होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८-१९ सालच्या रणजी मोसमाच्या फायनलमध्ये विदर्भनं सौराष्ट्रचा ७८ रननी पराभव केला. विदर्भच्या आदित्य सरवटे हा विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला. फायनलमध्ये आदित्य सरवटेनं एकूण ११ विकेट घेतल्या. यातल्या ६ विकेट त्याला शेवटच्या इनिंगमध्ये मिळाल्या. आदित्य सरवटेनं दोन्ही इनिंगमध्ये चेतेश्वर पुजाराची महत्त्वाची विकेट घेतली. विदर्भानं ठेवलेल्या २०६ रनचा पाठलाग करताना सौराष्ट्रची टीम पाचव्या दिवशी १२७ रनवर ऑल आऊट झाली.


इराणी ट्रॉफीबरोबरच बीसीसीआयनं इंग्लंड लायन्सविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या चार दिवसीय अनधिकृत टेस्ट मॅचसाठी भारत ए टीमची घोषणा केली आहे. केएल राहुलला भारत ए टीमचा कर्णधार बनवण्यात आलंय. फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर आणि वरुण एरॉनला भारत ए टीममध्ये संधी देण्यात आली आहे.


शेष भारत


अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेट कीपर), कृष्णप्पा गौतम, धर्मेंद्रसिंग जडेजा, राहुल चहर, अंकित राजपूत, तनवीर उल हक, रोनित मोरे, संदीप वॉरियर, रिंकू सिंग, स्नेल पटेल


भारत ए


लोकेश राहुल (कर्णधार), एआर इश्वरन, प्रियांक पांचाळ, अंकित बावणे, करुण नायर, रिकी भुई, सिद्धेश लाड, केएस भरत (विकेट कीपर), शाहबाज नदीम, जलज सक्सेना, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, वरुण एरॉन