नागपूर : विदर्भाच्या या विजयानंतर विदर्भ क्रिकेट असोशिएशन आणि एकूण नागपुरात जल्लोषाचं वातावरण आहे. नागपुरातल्या काही तरुण क्रिकेटर्सशी आनंद व्यक्त करताना अंतिम फेरीत संघ चांगली कामगिरी करील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भ क्रिकेटला यंदा अचानक अच्छे दिन आले आहेत. रणजी क्रिकेटच्या इतिहास प्रथमच विदर्भाच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. कोलकात्तात झालेल्या सेमीफायनलमध्ये चुरशीच्या लढतीत विदर्भ संघानं कर्नाटकला ५ रन्सनी मात दिली. 


विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला तो रजनीश गुरबानी. त्यानं दुस-या इनिंगमध्ये ७ विकेट्स काढल्या. दुस-या इनिंगमध्ये कर्नाटकच्या विनयकुमार मिथुन आणि श्रेयस गोपाल यांनी चिवट झुंज देत मॅच अटीतटीची केली. 



पण रजनीश गुरबानी विदर्भाच्या मदतीला धाउन आला. गुरबानीनं कर्नाटकच्या ७ विकेट्स घेऊन, आपल्या विदर्भ टीमला फायनलमध्ये पोहोचवलं. आता फायनलमध्ये विदर्भ टीमची दिल्लीशी गाठ पडणार आहे.