व्हिडिओ : भारताविरुद्ध मॅचमध्येही बांगलादेशी खेळाडूंचे गैरवर्तन
निधाहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताचा थरारक विजय झाला.
नवी दिल्ली : निधाहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताचा थरारक विजय झाला.
दिनेश कार्तिकच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवला. बांगलादेश टीमचा चिवट आणि आक्रमकपणा संपूर्ण सिरीज दरम्यान पाहायला मिळाला.
जगभरातून निंदा
श्रीलंकेविरुद्ध शानदार विजय मिळविल्यानंतर बांगलादेशी खेळाडूंनी 'नागिण डान्स'करुन त्यांना डिवचलं होतं.
एवढच नव्हे तर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही झाला. या कृत्याची जगभरातून निंदा करण्यात आली. भारताविरुद्धच्या सामन्यातही बांगलादेशी खेळाडूंचे असेच कारनामे समोर आले.
व्हिडिओ व्हायरल
श्रीलंकेला हरविल्यानंतर आणि हिणवल्याने स्टेडियममधील बहुतांश प्रेक्षक भारताच्या बाजूने होते. बांगलादेशी बॅट्समन आऊट झाल्यानंतर प्रेक्षकांमधून आरडाओरडा सुरू झाला. आऊट झालेल्या खेळाडूच्या नावाने ओरडणे ही तशी सामान्य बाब आहे. पण बांगलादेशी बॅट्समने चिडून लाथ मारल्याचे व्हिडियोत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रागावर नियंत्रण नाही
या व्हिडियोत बांगलादेशचा खेळाडू सौम्य सरकार दिसतोय. तिसऱ्या विकेटच्या रुपात तो पॅव्हेलियनमध्ये परतला. लंकेच्या मॅचनंतर ड्रेसिंग रुममध्ये तोडफोड केलेल्या घटनेंतर हे खेळाडू शांत होतील असे वाटत होते. पण रागावर नियंत्रण न ठेवता येत असल्याचे पुन्हा दिसून आले.