नवी दिल्ली : क्रिकेटविश्वात विचित्र रेकॉर्ड्स घडत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. एका मॅचमध्ये असाच काहीसा विचित्र रन आऊट झाल्याचं समोर आलं आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियामधील स्थानिक बिग बॅश लीग टी-२० टूर्नामेंटमध्ये विचित्र रन आऊट झाल्याचं पहायला मिळालं. १० जानेवारी रोजी ब्रिसबन हीट आणि होबार्ट हॅरीकेन्स यांच्यात झालेल्या मॅचमध्ये अॅलेक्स रोज रन आऊट झाला आणि एक इतिहासही घडला.


या मॅचमध्ये ब्रिसबेन हीटचा बॅट्समन अॅलेक्स रोज रन आऊट झाला आणि हा केवळ बिग बश लीगमधील नाही तर क्रिकेटच्या इतिहासातील दुर्भाग्यपूर्ण रन आऊट ठरला. 


हा रन आऊट पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मॅचच्या १७व्या ओव्हरमधील शेवटची ओव्हर टायमल मिल्स टाकत होता. त्याने यावेळी ऑफ स्टम्पजवळ शॉर्ट बॉल टाकला आणि या बॉलवर अॅलेक्स रोजने मिडविकेटवर पुल शॉट मारला.


यावेळी एक रन पूर्ण केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या रनसाठी धाव घेतली. मात्र, मॅचमध्ये बाधा आणण्यासाठी अंपायरने अॅलेक्सला आऊट दिलं. 


मॅचमध्ये बाधा आणल्याप्रकरणी नियमांनुसार अंपायरने रन आऊट दिलं. या नियमानुसार, एखादा बॅट्समन जाणून-बुजून थ्रोच्यामध्ये आल्यास त्याला आऊट दिलं जाऊ शकतं. अॅलेक्सने १९ बॉल्समध्ये २७ रन्स बनवले होते.



ब्रिसबन हीटच्या टीमचा कॅप्टन ब्रँडन मॅक्युलम आणि होबार्ट हॅरीकेन्सचा कॅप्टन जार्ज बॅलीने आपले विचार शेअर केले आहेत.