ऍडलेड : ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू ऑलिव्हर डेव्हिसनं अंडर-१९ स्थानिक वनडे चॅम्पियनशीपच्या मॅचमध्ये रेकॉर्ड केलं आहे. ऑलिव्हरनं एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारल्या. एवढच नाही तर डेव्हिसनं या मॅचमध्ये द्विशतकही केलं. न्यू साऊथ वेल्स मेट्रो टीमचा कर्णधार ऑलिव्हरनं नॉर्थन टेरेटोरीविरुद्ध ११५ बॉलमध्ये १७ सिक्स आणि १४ फोरच्या मदतीनं २०७ रनची खेळी केली. ऑलिव्हरच्या या खेळीमुळे न्यू साऊथ वेल्स मेट्रोनं ४ विकेट गमावून ४०६ रन केले. ऑलिव्हरनं इनिंगच्या ४०व्या ओव्हरमध्ये ६ सिक्स मारले. ऑलिव्हरनं शतक ते द्विशतक ३९ बॉलमध्ये पूर्ण केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक अंडर-१९ क्रिकेटमध्ये २००१-०२ साली जेसन क्रेझानं द्विशतक केल्यानंतरच हे पहिलंच द्विशतक आहे. ऑलिव्हरनं ४०व्या ओव्हरमध्ये नॉर्थन टेरेटोरीच्या जॅक जेम्सच्या बॉलिंगवर एका ओव्हरमध्ये ६ सिक्स लगावल्या. अंडर-१९ चॅम्पियनशीपमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक सिक्सचं रेकॉर्ड आता ऑलिव्हरच्या नावावर आहे. ऑलिव्हर डेव्हिसनं त्याच्या सगळ्या सहा सिक्स स्लॉग स्वीप मारून पूर्ण केल्या.



युवराजच्या ६ बॉलमध्ये ६ सिक्स


२००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगनं इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये ६ सिक्स लगावले. याच मॅचमध्ये युवराजनं टी-२० क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद अर्धशतक १२ बॉलमध्ये ५० रन केले.



६ बॉलमध्ये ६ सिक्सचं रेकॉर्ड


- सगळ्यात आधी वेस्ट इंडिजचे महान ऑलराऊंडर सर गॅरी सोबर्स यांनी १९६८ मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना ग्लॅमॉर्गनच्या माल्कम नॅशच्या एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारले.


- १९८५ साली रवी शास्त्रीनं मुंबईकडून खेळताना बडोद्याच्या तिलकराजच्या एका ओव्हरमध्ये ६ सिक्स लगावले.


- २००७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सनं नेदरलँड्सच्या डॅन वेन बंगच्या एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यावेळी पहिल्यांदाच हे रेकॉर्ड झालं होतं.


- २००७ साली सप्टेंबर महिन्यात टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराजनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये ६ सिक्स फटकावले.


- २००७ साली रॉस व्हिटली नावाच्या खेळाडूनं इंग्लंडमधल्या टी-२० ब्लास्ट स्पर्धेत हे रेकॉर्ड केलं. वॉर्सेस्टशायरच्या व्हिटलीनं यॉर्कशायरविरुद्ध ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारले.