मुंबई : छोट्या पडद्यावरचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस 12' लवकरच सुरू होतोय. येत्या 16 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची घोषणाही करण्यात आलीय. या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्य बनणाऱ्या स्पर्धकांमध्ये एका भारतीय क्रिकेटरचाही समावेश आहे... या स्पर्धकाचं नाव आहे एस श्रीसंत... श्रीसंतच्या नावाची याआधीही चर्चा झाली होती, परंतु तो आता या कार्यक्रमात दिसणार या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालंय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यक्रमाच्या प्रिमिअरच्या एक दिवस अगोदर प्रोमो जाहीर करत स्पर्धकांच्या नावाचा खुलासा करण्यात येतोय. बिग बॉसच्या घरात श्रीसंत असा स्पर्धक आहे जो मैदानावर आणि त्यापेक्षा मैदानाबाहेरही वादांत राहिला.



श्रीसंतनं आपल्या बॉडीमध्ये बराच बदलही केलाय. सोशल मीडियावर आपल्या वर्कआऊटचे अनेक व्हिडिओही तो अनेकदा शेअर करताना दिसतो. 


परंतु, श्रीसंतचं हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन त्याच्या आगामी कन्नड सिनेमासाठी आहे. 



श्रीसंत लवकरच कन्नड सिनेमा 'कॅम्पागोडा-2'मध्ये हिरो म्हणून दिसणार आहे. यासाठी श्रीसंत जिममध्ये बरीच मेहनत घेताना दिसतोय. 


मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर श्रीसंतचं क्रिकेट करिअर संपुष्टात आलंय. काही दिवसांपूर्वी तो एका बॉलिवूड सिनेमातही दिसला होता. 



हिंदी सिनेमा 'अक्सर 2'मधून श्रीसंतनं आपल्या करिअरला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता. या सिनेमातून श्रीसंतनं डेब्यू केला मात्र त्याला हवं तसं यश मिळालं नाही.


2008 च्या आयपीएलमध्ये हरभजन सिंहनं श्रीसंतला मैदानातच एक जोरदार थप्पड लगावली होती. त्यामुळेही श्रीसंत चर्चेत आला होता. तर हरभजनवर 11 मॅचची बंदी आणि एका मॅचचं मानधनाचा दंडही लावण्यात आला होता. 



या प्रकरणानंतर आयपीएलच्या या सत्रात टीम इंडियाचा हा माजी बॉलर मैदानावरच रडतानाही दिसला होता. 



आयपीएल 2013 दरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांत अगोदर एस श्रीसंला हायकोर्टच्या सिंगल बेन्चकडून दिलासा मिळाला होता. परंतु, बोर्डानं पुन्हा एकदा याचिका दाखल केल्यानंतर त्याला झटका लागला. यानंतर बीसीसीआयनं आपल्यावर लावलेल्या आजीवन बंदी हटवण्यासाठी आपण हरएक प्रयत्न करणार असल्याचं श्रीसंतनं म्हटलं होतं. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.