मुंबई : आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या क्रिस गेलला नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावामध्ये सुरुवातीला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. अखेर तिसऱ्या वेळी किंग्ज इलेव्हन पंजाबनं गेलला त्यांच्या टीममध्ये घेतलं. पहिल्या दोन्ही वेळा बोली न लागल्यामुळे क्रिस गेल सोशल मीडियावर ट्रोल झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये जास्त वय असलेल्या खेळाडूंवर बोली लावण्यात टीम इच्छूक नव्हत्या. त्यामुळे गेल, मलिंगा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना याचा फटका बसला. मलिंगालातर शेवटपर्यंत कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेलला टीममध्ये घेतल्याबाबत किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटर वीरेंद्र सेहवागनं स्पष्टीकरण दिलं. गेलचा आक्रमक खेळ आणि बॉलर्सना उद्धवस्त करण्याची ताकद गेलमध्ये असल्यामुळे आम्ही गेलला टीममध्ये घेतल्याचं सेहवाग म्हणाला. किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत आयपीएल खेळणार असल्यामुळे क्रिस गेल खुश झाला आहे. भांगडा करतानाचा एक व्हिडिओ क्रिस गेलनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.