जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं चांगली कामगिरी केली. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला ४०१ रन्सची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियानं दिवसाची सुरुवात ११०/६ अशी केली होती. पण कॅप्टन टीम पेननं ६२ आणि पॅट कमीन्सनं ५० रन्स केल्या. या दोघांच्या पार्टनरशीपमुळे ऑस्ट्रेलियानं २२१ रन्सपर्यंत मजल मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅचच्या तिसऱ्या दिवशी डीन एल्गारनं ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेनचा शानदार कॅच घेतला. सुपरमॅनसारखी हवेत उडी मारून एल्गारनं पेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. एल्गारचा हा कॅच सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.



मधमाशीमुळे शॉन मार्श आऊट होता-होता वाचला


ऑस्ट्रेलियानं ९१ रन्सवर ४ विकेट गमावलेल्या असताना शॉन मार्शला दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज बॉलिंग करत होता. यावेळी विकेट कीपर क्विंटन डीकॉकला मिळालेली स्टम्पिंगची संधी मधमाशीनं हिरावून घेतली. मधमाशी चावल्यामुळे डिकॉकला स्टम्पिंग करता आलं नाही.