मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात महाग लीग असलेल्या IPLच्या मोसमाला रंगतदार सुरुवात झाली आहे. क्रिकेट लीगमध्ये ग्लॅमरस तडका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण पूर्वीपासूनच आयपीएलमध्ये दिसली आहे. मात्र, यंदा दीपिकाचा अंदाज काही वेगळात पहायला मिळाला. दीपिकाच्या इशाऱ्यावर टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि हिटमॅन रोहित शर्मा सारखे खेळाडू थिरकताना दिसले.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही बोलत आहोत सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कमर्शियलची. यामध्ये अभिनेत्री दीपिकाने केवळ महेंद्रसिंग धोनीलाच नाही तर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत संपूर्ण क्रिकेट टीमला डान्स फ्लोअरवर बोलवलं. या सर्वांनी IPL च्या थीम साँगवर जबरदस्त डान्स केला. आयपीएलच्या एका जाहिरातीसाठी अभिनेत्री दीपिका आणि क्रिकेट खेळाडूंनी हा डान्स परफॉर्मन्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.



दरम्यान, यापूर्वी बातम्या आल्या होत्या की, गोआयबीबीने एका जाहिरातीसाठी बंगळुरुच्या टीमसोबत संपर्क केला होता. मात्र, यासाठी विराट कोहली तयार झाला नाही. अशा प्रकारे गोआयबीबोची स्पॉन्सरशिप बंगळुरुच्या टीमने गमावली.


कोट्यावधींची डील होणार होती...


ही जाहिरात याच आयपीएल सीजनसाठी बनवण्यात येणार होती. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने दीपिका पादुकोणसोबत जाहिरात करण्यास नकार दिला. एक वेबसाईट इनसाईड स्पोर्ट्सच्या मते, विराटच्या या निर्णयामुळे आयपीएलमध्ये त्याची टीम आरसीबीसोबत ११ कोटी रुपयांची डील झाली नाही.



विराट आणि दीपिकासोबत ही जाहिरात गो आयबीबो कंपनीला करायची होती. या संदर्भात आरसीबी सोबतची बोलणी जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, शेवटी विराटने ही जाहिरात करण्यास नकार दिला.


आरसीबीसोबतच्या एका विश्वसनीय सूत्रांनी ही डील रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, ही डील रद्द होण्याचं कारणं विराट कोहली नाहीये. आम्ही आणखीन चांगल्या डीलची वाट पाहत होतो त्यामुळे आम्ही ही डील पूर्ण न करण्याचा निर्णय घेतला.