गॉल (श्रीलंका) : श्रीलंकेत सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने लंकेला 211 रन्सने जोरदार मात दिली. मागच्या 13 मॅचनंतर परदेशी मैदानातला इंग्लंडचा हा पहिला विजय आहे. त्यामुळे या विजयानंतर इंग्लंडच्या प्लेअरचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यावेळी एक अजब घटना घडली. एक प्रेक्षक धावत धावत थेट मैदानात पोहोचला. रंगना हेराथच्या रुपात श्रीलंकेचा शेवटचा विकेट पडला आणि इंग्लंडचे प्लेअर मैदानात आनंद साजरा करु लागले. ते अंपायर आणि श्रीलंकेच्या प्लेअर्सना औपचारीक अभिवादन करत होते. तेवढ्यात स्टेडियममधून एक प्रेक्षक आला. तो केवळ शॉर्ट्सवर होता. अंपायर किंवा खेळाडूंना हा प्रकार कळण्याच्या आतच तो शॉर्ट्स देखील काढू लागला. तेवढ्यातच सुरक्षा रक्षक तिथे पोहोचले.


सुरक्षा रक्षकांची धावपळ 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा रक्षक त्याच्या मागे धावू लागले पण तो काही त्यांच्या हाती लागेना. त्याला स्वत:चे पूर्ण कपडे काढायचे होते का नाही ? हे काही स्पष्ट झालं नाही.


जेव्हा सुरक्षा रक्षक त्याच्या पर्यंत पोहोचले तेव्हा त्याने मैदानाबाहेर उडी मारली होती.


तोपर्यंत मैदानात सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात पोहोचले होते. तेव्हाही तो प्रेक्षक त्यांच्या हाती लागला नाही.


सर्वांना चकमा देत तो बॉऊंड्री लाईन पर्यंत पोहोचल्यावर सुरक्षा रक्षकांच्या हाती लागला.


स्टेडियममध्ये जमा असलेल्या सर्व प्रेक्षकांनी या घटनेची मजा घेतली.