Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (IND vs AUS 1st ODI) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या सिरीजला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत विजय मिळवला आहे. मोहालीत (Mohali) खेळवलेल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सर्व गडी गमावून 276 धावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नर, स्मिथ, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र भारतीय खेळाडूंनीही खराब क्षेत्ररण करुन ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अनेकदा जीवदान दिलं होतं. खराब क्षेत्ररक्षणवारुन टीका सुरु असताना सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) जबरदस्त विकेट घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधारपदी असलेल्या केएल राहुलेही (KL Rahul) या सामन्यात मोठी चूक केली होती. मात्र 40व्या षटकात सूर्यकुमारने डाईव्ह टाकून थेट थ्रो मारल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन धावबाद झाला. दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात कॅमेरून ग्रीन बाद झाला. मोहम्मद शमी 40 वी ओव्हर टाकत असताना चेंडू ग्रीनच्या बॅटच्या कडेला लागून विकेटकीपर केएल राहुलच्या पायाखालून निघून गेला. तितक्यात त्याने थर्ड मॅनच्या खेळाडूकडे बोट दाखवत चेंडू थांबवण्यासाठी सांगितले. त्याचवेळी ग्रीनने दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जोश इंग्लिस हा त्यावेळी चेंडूकडे बघत होता. ग्रीन दुसऱ्या धावेसाठी धावला इंग्लिसमुळे त्याला माघारी परतावं लागलं. पण त्याला क्रीझच्या आत पोहोचता आलं नाही आणि सूर्यकुमारने डायव्हिंग करून त्याला थ्रो मारून बाद केले. धावबाद झाल्यानंतर सूर्यकुमार ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवताना दिसला. त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की, आम्ही चांगले क्षेत्ररक्षण केले हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता. कारण त्याआधी भारतीय खेळाडूंनी अगदी खराब क्षेररक्षण केलं होतं.



कॅमेरून ग्रीन 52 चेंडूत 31 धावा करून शमीच्या चेंडूवर बाद झाला. इंग्लिसच्या चुकीमुळे कॅमेरून ग्रीन धावबाद झाला. स्टॉइनिसशिवाय शमीने शेवटच्या षटकांमध्ये मॅथ्यू शॉट आणि शॉन अॅबॉट यांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नऊ चेंडूत नाबाद 21 धावा करत संघाची धावसंख्या 275 च्या पुढे नेली.


केएल राहुलने केली निराशा


ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना सूर्यकुमारच्या एका थ्रोवर कॅमरून ग्रीनला रनआऊट करण्याची पूर्ण संधी होती. मात्र कर्णधार केएल. राहुलने विकेटमागे चूक केली. जडेजाच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमरून ग्रीनने एक्स्ट्रा कव्हर फिल्डरकडे शॉट खेळला आणि रन घेण्यासाठी तो धावला. सूर्याने तो चेंडू पकडला आणि केएल. राहुलच्या दिशेने फेकला. मात्र राहुलला चेंडू पकडता आला नाही. राहुलच्या या चुकीमुळे कॅमरून ग्रीनला जीवदान मिळालं. केएल राहुलच्या या चुकीमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.