Video : संजू सॅमसनच्या चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी, गाडीतून उतरताच केलं असं काही तुम्हालाही वाटेल अभिमान
संजू सॅमसनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान (IND vs WI) पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील शेवटचा सामना अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 88 धावांनी पराभव केला. भारताने 4-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे.
यानंतर भारतीय संघाचा विकेटकीपर आणि फलंदाज संजू सॅमसनचा (Sanju Samson) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या सामन्याच्या नंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोल्फ कार घेऊन मैदानात उतरला होता. त्याच्यासोबत यावेळी संजू सॅमसनही होता.
यावेळी स्टेडियमधील चाहते संजू संजू असे ओरडू लागले. त्यानंतर संजू सॅमसने गोल्फ कारमधून खाली उतरत सर्वांना सॅल्यूट केले. संजू सॅमसनच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, संजू सॅमसनला आशिया कप 2022 (asia cup 2022) साठी संधी देण्यात आलेली नाही त्यामुळे त्याचे चाहतेही नाराज आहेत. 27 वर्षीय संजू सॅमसनने 2015 मध्ये आंतरराष्टीय सामन्यांमधून खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर सातत्याने तो भारतीय संघाच्या आत बाहेर होत राहिला. त्यामुळे त्याला संघात आपले स्थान निश्चित करता आले नाही.
संजू सॅमसनने आतापर्यंत भारतीय संघासाठी चार एकदिवसीय आणि 16 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दोन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 39.33च्या सरासरीने 118 आणि 21.14 च्या सरासरीने 77 धावा केल्या आहेत.