ऍडलेड : चेतेश्वर पुजाराचं शतक आणि भारताच्या भेदक बॉलिंगमुळे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर १९१/७ एवढा होता. दिवसाअखेर ट्रेव्हिस हेड ६१ रनवर नाबाद आणि मिचेल स्टार्क ८ रनवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून आर.अश्विनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं २५०/९ अशी केली होती. पण दिवसाच्या पहिल्याच बॉलला मोहम्मद शमीच्या रुपात भारताची शेवटची विकेट गेली. २५० रनवर ऑल आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येत रोखण्याचं आव्हान भारताच्या बॉलरपुढे होतं. भारताच्या बॉलरनीही हे आव्हान लिलया पेललं. ईशांत शर्मानं ऑस्ट्रेलियाच्या इनिंगच्या तिसऱ्याच बॉलला एरॉन फिंचला बोल्ड केलं. ईशांत शर्मानं टाकलेल्या या बॉलमुळे दोन स्टम्प हवेत उडून खेळपट्टीच्या बाहेर गेले. 



तिसऱ्याच बॉलला विकेट मिळाल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीही जल्लोषामध्ये दिसला. संपूर्ण दिवसभर विराट कोहली भारतीय बॉलरना उत्तेजीत करत होता. एवढच नाही तर त्यानं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनलाही मैदानात आल्याबरोबर लगेचच स्लेजिंग करायला सुरुवात केली.



भारताचा डाव २५० रनवर आटोपल्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया अजूनही ५९ रननी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशीही अशाच प्रकारे भेदक बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर ऑल आऊट करण्याचं आव्हान भारतीय टीमपुढे असणार आहे. दुसऱ्या दिवसासारखीच बॉलिंग भारतीय टीमनं केली तर या टेस्ट मॅचवरची त्यांची पकड मजबूत होईल.