नवी दिल्ली : एकीकडे आपल्या देशात राष्ट्रगीताच्या दरम्यान उभे राहावं की राहण्याची सक्ती असू नये, याबद्दल वाद सुरू आहे... तर दुसरीकडे अबुधाबीचा एक व्हिडिओ समोर आलाय... जो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ आहे 'इंटरनॅशनल ज्युडो फेडरेशन'द्वारे आयोजित आबुधाबी ग्रँड स्लॅम स्पर्धेदरम्यानचा... या स्पर्धेत इज्राईलच्या एका खेळाडूनं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावलं...


पण, जेव्हा मेडल सेरेमनीची वेळ आली.. तेव्हा मात्र त्या खेळाडूसमोर ना त्याच्या देशाचं राष्ट्रगीत वाजवलं गेलं... ना त्याच्या देशाचा झेंडा फडकावण्यात आला... यामुळे नाराज झालेल्या त्या खेळाडूनं असं काही केलं की सर्वजण केवळ पाहातच राहिले.


त्याचं झालं असं की आबुधाबीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ६६ किलो वजनाच्या गटात ताल फ्लिकर या इज्राईलच्या खेळाडूनं बाजी मारली... आणि सुवर्ण पदक पटकावलं. 


परंतु, २५ वर्षीय फ्लिकरला तेव्हा झटका बसला जेव्हा आबुधाबीमध्ये त्याच्या राष्ट्रगीताला आणि ध्वजाला सन्मान नाकारण्यात आला... 


युनायटेड अरब अमिरातच्या सरकारला इज्राईलसोबत भेदभाव करणारा देश म्हणून ओळखलं जातं. याचमुळे त्यांनी फ्किकरला मेडल जिंकल्यानंतरही इज्राईल राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताला सन्मान नाकारला. 


परंतु, सुवर्ण पदक जिंकणाऱ्या फ्लिकरनं स्वत:च स्टेजवर उभं राहून आपलं राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली... हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोकांनी त्याच्यावर कौतुकाच वर्षाव केलाय.