VIDEO : भारतीय क्रिकेट इतिहासात असा आऊट होणारा `हा` तिसरा खेळाडू
श्रीलंकेच्या विरूद्ध निडास ट्रॉफी सामन्यात टीम इंडियातील फलंदाज केएल राहुलला पहिल्यांदाच संधी मिळाली होती.
मुंबई : श्रीलंकेच्या विरूद्ध निडास ट्रॉफी सामन्यात टीम इंडियातील फलंदाज केएल राहुलला पहिल्यांदाच संधी मिळाली होती.
शिखर धवन, रोहित शर्मा आणि सुरेश रैना आऊट झाल्यानंतर केएल राहुलवर अधिक जबाबदारी आली. तसेच केएल राहुल चांगल्या पद्धतीने फलंदाजी देखील करत होता. मात्र जीवन मेंडिसच्या बॉलवर केएल राहुलची विकेट गेली. 10 व्या ओव्हरमध्ये मेंडिस बॉलिंगसाठी आला आणि शेवटच्या बॉलवर राहुलची विकेट गेली. त्याने 17 बॉलमध्ये 18 धावा केल्या आहेत.
काय आहे हा विक्रम ?
टीम इंडियाकडून टी 20 च्या इतिहासात हिट विकेटमुळे केएल राहुल चर्चेत आला आहे. या अगोदर कोणताही भारतीय खेळाडू हिट विकेटमुळे चर्चेत नव्हता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 3 खेळाडू हिट विकेट झाले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये लाला अमरनाथ 1949 मध्ये हिट विकेट झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये कोणताही भारतीय खेळाडू हिट विकेट झालेला नाही.
हा खेळाडू ठरला तिसरा खेळाडू ?
वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून नयन मोंगिया हा एकमात्र खेळाडू आहे ज्याने हिट विकेट केले आहेत. 1995 मध्ये ही हिट विकेट झाली होती. त्यानुसार केएल राहुल हा हिट विकेट करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.