नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या हा नुकताच विवाह बंधनात अडकला.


(व्हिडिओज पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल-१०)च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार ठरलेला कृणाल पांड्याने आपली गर्लफ्रेंड पंखुडी शर्मासोबत लग्न केलं. 


पंखुडी आणि कृणाल यांचा विवाहसोहळा २७ डिसेंबर रोजी पार पडला. मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला क्रिकेटर्ससोबतच सेलिब्रेटी आणि मुकेस अंबानी परिवारानेही उपस्थिती लावली. 


टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याच्या रिसेप्शनलाही अंबानी परिवार उपस्थित नव्हता मात्र, कृणाल पांड्याच्या लग्नात मुकेश अंबानी आणि निता अंबानी आपल्या मुलांसोबत दाखल झाले. 



कृणाल आणि हार्दिक दोघेही आयपीएलमध्ये अंबानी यांची टीम मुंबई इंडियन्ससाठी खेळतात. विराट-अनुष्काचं रिसेप्शन मुंबईत २६ डिसेंबर रोजी पार पडलं. या ठिकाणी अंबानी परिवारातील निता अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी उपस्थित होता. 



हार्दिक पांड्याने संपूर्ण अंबानी परिवाराचं स्वागत केलं. कृणाल पांड्या हा गेल्या अनेक दिवसांपासून पंखुडी शर्मासोबत रिलेशनशीपमध्ये होता. 



आयपीएल-१०च्या सीजनमध्ये विजयी ट्रॉफीसोबत पंखुडी पहायला मिळाली होती आणि तेव्हापासून ती चर्चेत आली. त्यानंतर कृणालने म्हटलं होतं की, ती माझी गर्लफ्रेंड आहे आणि वेळ आल्यावर आम्ही दोघं लग्न करु.



कृणालच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अमिताभ बच्चन, क्रिकेटर इरफान पठाण, रोहित शर्मा, पार्थिव पटेल, जयदेव उनाडकटसोबतच इतरही क्रिकेटर्सने उपस्थित होते. लग्नापूर्वी मेहंदी सेरेमनी झाली त्यामध्ये पांड्या भावंडांनी डान्सही केला.