VIDEO: ना नो बॉल, ना डेड बॉल...तरीही क्लिन बोल्ड
क्रिकेटच्या इतिहासात एक अशी गोष्ट घडलीये जी आतापर्यंत कधीही घडली नसेल.
मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात एक अशी गोष्ट घडलीये जी आतापर्यंत कधीही घडली नसेल. ही गोष्ट म्हणजे क्लिन बोल्ड होऊनही खेळाडूला आऊट करार देण्यात आलेला नाही. हे तुम्हाला खरं वाटणार नाही, मात्र ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या महिलांच्या नॅशनल क्रिकेटमध्ये हा प्रकार घडला आहे. आता हे नेमकं कसं हा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच.
ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या नॅशनल क्रिकेट लीगमध्ये क्विन्सलँड आणि तस्मानिया यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान बेलिंडा वाकारेवा हिच्या गोलंदाजीवर जॉर्जिया वोल क्लिन बोल्ड झाली होती. मात्र तरीही तिला नॉटआऊट देण्यात आलं.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट
बेलिंडाने टाकलेला हा नो बॉल किंवा डेड बॉल यापैकी काहीही नव्हता. तरीही त्या फलंदाजाला नॉट आट करार देण्यात आला. करण्यात आला. क्वीन्सलँडच्या डावाची 14 वी ओव्हर सुरू होती. या ओव्हरच्या चौथा बॉल थेट विकेटकीपरकडे गेला. मात्र त्यापूर्वी विकेटचे बेल्स उडाले.
क्लिन बोल्ड होऊनही नॉटआऊट
क्रिकेटच्या नियमांनुसार, जॉर्जियाला वॉल खरंतर आउट होती. मात्र यासंदर्भात तस्मानियाच्या टीमकडून कोणतंही आवाहन करण्यात आलं नाही. क्रिकेटचा नियम असा आहे की, जोपर्यंत फिल्डींग करणारी टीम किंवा गोलंदाज अपील करत नाही तोपर्यंत अंपायर फलंदाजाला आऊट देऊ शकत नाही. या ठिकाणी असंच घडलं.
14व्या ओव्हरमध्ये जॉर्जियाने खेळलेल्या बॉलचा स्पर्श तिच्या बॅटला झाला नसल्याचं अनेकांना वाटलं. यादरम्यान, कॉमेंट्रिटर्सना देखील असंच वाटलं की, विकेटकीपरच्या ग्लोजमुळे विकेट्सचे बेल्स उडाले. नंतर याचा रिप्ले दाखवल्यानंतर सर्वांनाच खरा प्रकार कळला.
सोशल मीडियावर व्हीडियो व्हायरल
त्यावेळी जॉर्जिया 26 रन्सवर खेळत होती. मात्र संधी मिळूनही तिला त्याचा योग्य फायदा घेता आला नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.