अबुधाबी : पाकिस्तानी क्रिकेटपटूंचं हास्यास्पदरित्या रनआऊट होण्याचा सिलसिला कायम आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू यासिर शाहचा खेळपट्टीवर पळताना रनआऊट झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सध्या तिसरी टेस्ट मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानचा स्पिनर यासिर शाहनं टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २०० विकेट पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. हे रेकॉर्ड करूनही यासिर शाह सोशल नेटवर्किंगवर त्याच्या रनआऊटमुळे ट्रोल होतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी सोमरविलेच्या बॉलवर सरफराजनं एक रन काढली. यानंतर सरफराजला दुसरी रनही काढायची होती पण यासिर शाहचा बूट निघाला त्यामुळे त्याला धावायला अडचण येत होती. या सगळ्या गोंधळामध्येच यासिर शाह रनआऊट झाला. या प्रकारानंतर सरफराज खानही मैदानातच भडकला.



यासिर शाहचा विश्वविक्रम


याच मॅचमध्ये यासिर शाहनं टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात जलद २०० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. न्यूझीलंडचा रॉस टेलर त्याचा २००वा बळी ठरला. या मॅचआधी यासिर शाहच्या नावावर ३२ टेस्टमध्ये १९५ विकेट होत्या. त्यानं न्यूझीलंडच्या पहिल्या इनिंगमध्ये ३ विकेट घेतल्या होत्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २ विकेट घेऊन त्यानं २०० विकेटचा टप्पा गाठला. ३२ वर्षांच्या यासिर शाहनं त्याच्या ३३व्या टेस्टमध्ये २०० विकेटचा पल्ला गाठला. याचबरोबर त्यानं ऑस्ट्रेलियाच्या सीवी ग्रिमेट यांचं ८२ वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं. ग्रिमेट यांनी ३६ टेस्ट मॅचमध्ये २०० विकेटचा विक्रम केला होता.