विकेट घेतल्यानंतर बॉलरचं `डेंजर` सेलिब्रेशन
विकेट घेतल्यावर किंवा शतक केल्यानंतर क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन करतात.
मुंबई : विकेट घेतल्यावर किंवा शतक केल्यानंतर क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन करतात. यामध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचं सेलिब्रेशन जरा हटकेच असतं. कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्येही अशाच प्रकारचं पण धोकादायक सेलिब्रेशन पाहायला मिळालं. हे सेलिब्रेशन कोणत्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूनं नाही तर अफगाणिस्तानच्या खेळाडूनं केलं. सीपीएलच्या मॅचमध्ये सेंट लुशिया स्टार्सनी बारबाडोस ट्रिडेंट्सचा ३८ रननी पराभव केला. या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा लेग स्पिनर केस अहमद यानं विकेट घेतल्यावर अनोखं सेलिब्रेशन केलं.
अफगाणिस्तानचा लेग स्पिनर १८ वर्षांचा केस अहमद बारबाडोसकडून खेळताना चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यानं ड्वेन स्मिथची विकेट घेतली. अहमदनं बॉल मधल्या स्टंपवर ठेवला. स्मिथनं केसचा बॉल आधी खेळला आणि सोपा कॅच दिला. लेंडल सिमन्सनं बाऊंड्रीवर स्मिथचा कॅच पकडला. यानंतर अहमदनं कोलांटी उडी मारून सेलिब्रेशन केलं.
सेंट लुशियानं पहिले बॅटिंग करत २० ओव्हरमध्ये २२६ रन केले. यामध्ये कायरन पोलार्डनं शतक झळकावलं. डेव्हिड वॉर्नर, लेंडल सिमन्स आणि डॅरेन सॅमी शून्य रनवर आऊट झाले.