नवी दिल्ली : साऊथ आफ्रिकेला आपल्या ग्राऊंडवर सहा वन डे सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने मात दिली आहे. पाचव्या वन डे सामन्यात साऊथ आफ्रिकेला ७३ रन्स मात दिली आणि सीरिज ४-१ ने खिशात घातली. या विजयाचे दावेदार रोहित शर्मा आणि कुलदीप यादव यांना ठरवलं गेलं. पण या सामन्यात आणखी एक खेळाडू असा होता ज्याने या विजयात मोठी भूमिका निभावली. तो म्हणजे हार्दिक पांड्या.


झिरो ठरला हिरो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचव्या वन डे सामन्याच्या विजयाचं श्रेय ११५ रन्सची शानदार खेळी केलेल्या रोहित शर्मा आणि ४ विकेट घेणा-या कुलदीप यादवला गेलं. पण हा इतिहास रचण्यात हार्दिक पांड्या महत्वाचा ठरला. हार्दिक पांड्याच्या जबरदस्त फिल्डींगचा नजारा यावेळी बघायला मिळाला. जेपी डुमिनी आणि एबी डिविलियर्सला आऊट केल्यावर आफ्रिका टीमला दणका दिल्यानंतर पांड्याने शानदार फिल्डींगमधून दमदार खेळ केला. 



पांड्याने अमलाला केले रनआऊट आणि पलटला सामना


पोर्ट एलिझाबेथमध्ये पाचव्या वन डेमध्ये हार्दिक पांड्याच्या दमदार फिल्डींगमुळे सामना पूर्णपणे पलटला. सामना फारच नाजूक स्थितीत होता. हाशिम अमला हळूहळू टीमला विजयाकडे घेऊन जात होता. मात्र पांड्याच्या एका शानदार थ्रोमुळे हाशिम अमला रनआऊट झाला. या सामन्याचा हा टर्निंग पॉईंट होता.