मुंबई : जगभरातील मोठमोठ्या बॉलर्सची धुलाई करत घाम फोडणारा टीम इंडियाचा स्टार बॅट्समन शिखर धवन सध्या आपल्या परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र, याच शिखर धवनला झटका दिला आहे तो त्याची पत्नी आयशाने. शिखरच्या बॉलिंगवर पत्नी आयशाने जबरदस्त बॅटिंग केल्याचं पहायला मिळत आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतचं शिखर धवन आपली पत्नी आणि मुलांसोबत मस्ती करताना पहायला मिळाला. चेंडूची छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर दोषी आढळला. त्यानंतर आता त्याच्या जागेवर हैदराबाद सनरायजर्सच्या टीमची धूरा शिखर धवनला सोपण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, टीम मॅनेजमेंटने केन विलियमसनकडे टीमची धूरा सोपवण्यात आली.


इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ


हैदराबाद सनरायजर्सच्या टीमकडून खेळणाऱ्या शिखर धवन सध्या आपल्या परिवारासोबत सुट्टीचा आनंद लुटत आहे. काही दिवसांपूर्वी शिखरने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.


आयशाने मारला सिक्सर


या व्हिडिओत शिखर आपल्या परिवारासोबत बीचवर क्रिकेट खेळताना दिसत आहे. शिखर धवन बॉलिंग करत आहे आणि त्याची पत्नी आयशा बॅटिंग करत आहे. शिखरची मुलगी फिल्डिंग करताना दिसत आहे.



७ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा ११वा सीजन सुरु होत आहे. त्यानंतर जवळपास दोन महिने सर्वच खेलाडू बीजी राहणार आहेत.