साउथम्पटन : भारत आणि इंग्लंडमधली तिसरी टेस्ट मॅच ३० ऑगस्ट म्हणजेच गुरुवारपासून सुरु होणार आहे. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये इंग्लंड २-१नं आघाडीवर आहे. चौथी टेस्ट मॅच जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरेल. पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर नॉटिंगहमच्या टेस्टमध्ये भारतानं शानदार पुनरागमन केलं. स्लिपमध्ये भारताने घेतेलेले कॅच हेदेखील भारताच्या विजयाचं कारण ठरलं. पण अजूनही भारताचे फिल्डिंग प्रशिक्षक श्रीधर या कामगिरीमुळे संतुष्ट नाहीत. कारण पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये भारतानं अनेक कॅच सोडले.


स्लिपमध्ये भारतीय फिल्डर अयशस्वी होत होते आणि कॅचही सोडत होते. त्यामुळे श्रीधर नाखुश होते. पण तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं शानदार फिल्डिंग केली. लोकेश राहुलनं दुसऱ्या स्लिपमध्ये ७ कॅच घेतले. पण तरीही चौथ्या टेस्टसाठी श्रीधर कोणताही धोका पत्करू इच्छीत नाही. त्यामुळे श्रीधर यांनी खेळाडूंचा कॅच पकडण्याचा सराव करून घेतला. शिखर धवन यानं त्याच्या सरावाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.