COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Shoaib Malik Dance Video : गेल्या काही दिवसांपासून भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत या दोघांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली नाही. मात्र या दोघांमधील नात्यात दुरावा आल्याचं बोलं जातं आहे. अशातच शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  (video viral on social media) होतो आहे. 


अरे हे काय शोएबला झालं तरी काय?


Viral Video : नात्यामध्ये दुरावा आल्यानंतर शोएब मलिकाला असं बघताना डान्स करताना पाहून नेटकरी हैरान झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शोएब डान्स करताना दिसतं आहे. नेटकरांना वाटतं असेल की त्याला घटस्फोट झाला आनंद झाला की काय? पण थांबा टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला. त्यावेळी लाईव्ह शो करत असताना पाकिस्तानच्या ए स्पोर्ट्स चॅनलवर शोएबने आनंदाच्या भरात डान्स केला. (Video Shoaib Malik Dance viral on Social media nmp)


वसीम-वकारही थिरकले


Wasim-Waqar also celebrated : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूस, वसीम अक्रम आणि मिसबाह उल हक देखील दिसत आहेत. पाकिस्तानच्या विजयानंतर हे दिग्गज नाचतानाही दिसले. भारत - इंग्लंड सेमीफायनलमध्ये (India - England semi-final) भारताचा विजय झाल्यास फायनल भारत-पाकिस्तान (India-Pakistan Final) रंगणार आहे. 



Sania Mirza - Shoaib Malik File For Divorce : सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये लग्न केलं. सानिया मिर्झाने टेनिस विश्वात भारताचं नाव उंचावलंय, तर शोएब मलिक हा पाकिस्तानमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. पण सोशल मीडियावर आता या दोघांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.