नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड याच्या कोचिंगमध्ये भारताची अंडर-१९ टीमने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या अंडर-१९ टीमने पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा १०० रन्सने पराभव केला. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये १० विकेट्सने भारताने विजय मिळवला. पहिल्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या विजयात मोठं योगदान होतं ते म्हणजे शुभमन गिल याचं.


ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीया यांना पराभूत करत भारतीय टीमने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये भारताचा मुकाबला बांगलादेशसोबत होणार आहे.


शुभमनच्या खेळीमुळे झाली विराटची आठवण


जिम्बाब्वेविरोधात खेळलेल्या तिसऱ्या मॅचमध्ये शुभमनने जबरदस्त परफॉरमन्स करत ९० रन्सची तुफानी खेळी खेळली. शुभमनने ५९ बॉल्समध्ये ही तुफानी खेळी खेळली. याच दरम्यान शुभमनने एक असा शॉट खेळला की जो पाहून सर्वांनाच विराट कोहलीची आठवण झाली.


झिम्बाब्वे विरोधात खेळताना शुभमनने एक सिक्सर लगावला. त्याच्या या सिक्सरची तुलना विराट कोहलीसोबत एक्सपर्ट्सने केली आहे. बीसीसीआयनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर कोहली आणि शुभमनच्या शॉर्ट आर्म जॅब शॉटची तुलना केली आहे.




अनुकूल रॉयने घेतले ४ विकेट्स


या मॅचमध्ये भारतीय स्पिनर अनुकूलने २० रन्स देत चार विकेट्स घेतले. तर, अभिषेक रायने दोन विकेट्स घेतले.