अतिउत्साहाच्या भरात विकेटकीपरने हातातली मॅच गमावली (व्हिडिओ)
मॅचमध्ये एका खेळाडूचा उत्साह किती महागात पडू शकतो हे या सामन्यातून लक्षात आलं आहे.
मुंबई : मॅचमध्ये एका खेळाडूचा उत्साह किती महागात पडू शकतो हे या सामन्यातून लक्षात आलं आहे.
हा प्रत्यय आला आहे ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात आलेल्या महिला टीमच्या बिग बॅश लीगमध्ये एका मॅचमध्ये पाहण्यात आलं आहे.
महिला बिग बॅश लीगच्या एका मॅचमध्ये असंच झालं आहे. मेलबर्न टीमच्या विकेटकीपरने ही महाभयंकर चूक केली आहे. आणि त्याचं असं नुकसान झालं की सहजपणे मेलबर्न संघ जिंकत होता. मात्र तो सामना अतिउत्साहामुळे टाय झाला असून नंतर सुपर ओवर्समध्ये गेला.
बुधवारी मेलबर्न रेनेगेड्स आणि सिडनी सिक्सर्स या दोन संघांमध्ये सामना खेळला गेला. मेलबर्नच्या टीमने पहिल्यांदा बॅटिंग करताना सात विकेट गमावून 120 धावा केल्या. 121 चं लक्ष समोरच्या संघावर देण्यात आलं होतं. सिडनी सिक्सर्स संघाची सुरूवात चांगली झालेली नाही. त्या संघाचे खेळाडू देखील एकापाठोपाठ आऊट झाले. तेव्हा झालं असं शेवटच्या बॉलमध्ये सिक्सर्स संघाला 3 धावा हव्या होत्या.
त्यावेळी बॅट्समन एकच धावा करू शकला आणि बॉल विकेटकीपरच्या हातात आला. आणि तिथेच विकेटकीपर एमाने चूक केली. ती विकेटच्या बाजूला जाऊन जोर जोरात उत्साह साजरा करू लागली. आणि यानंतरच दोन्ही बॅट्समनने दुसऱ्या रनसाठी धावा काढल्या. आणि तेव्हा त्यांनी दुसरा रन करून मॅच टाय केली.