मुंबई : टी-20 क्रिकेट खेळण्यासाठी सगळ्या देशांचे खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. टी-20 क्रिकेटचा रोमांच सध्या जोरात सुरु आहे. खेळाडूही मॅचनंतर मजा मस्ती करताना दिसत आहेत. मैदानामध्ये वेगवेगळ्या टीमकडून हे खेळाडू खेळत असले तरी मैदानाबाहेर मात्र त्यांच्यामधली मैत्री दिसत आहे. या मोसमादरम्यान चेन्नईचा खेळाडू ड्वॅन ब्राव्होचं गाणं व्हायरल होत आहे. ब्राव्होनं नुकतंच रन द वर्ल्ड हे गाणं लॉन्च केलं आहे.


ब्राव्होच्या गाण्यावर खेळाडूंचा डान्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका पार्टीच्या दरम्यान ब्राव्होनं हे गाणं म्हणलं. एवढच नाही तर ब्राव्होच्या या गाण्यावर विराट कोहली, के.एल.राहुल आणि हरभजन सिंगनं जबरदस्त डान्स केला आहे. ब्राव्होनं हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. विराट, राहुल आणि हरभजन जेव्हा तुमच्या गाण्यावर डान्स करतात तेव्हा खूप चांगलं वाटतं, असं ब्राव्हो म्हणाला आहे.



वर्ल्ड कपवेळीही गायलं होतं गाणं


२०१६च्या टी-20 वर्ल्ड कपवेळी ब्राव्होचं चॅम्पियन हे गाणंही लोकप्रिय झालं होतं. या गाण्यावरही ब्राव्होनं परफॉर्म केलं होतं.



बॉलीवूडमध्येही म्हणलं गाणं


चॅम्पियन गाण्यातून जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या ब्राव्होनं तुम बिन २ या चित्रपटातही गाणं म्हणलं आहे. या चित्रपटातल्या एका गाण्याला ब्राव्होनं आवाज दिला होता. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गायक आणि संगीतकार अंकित तिवारीनं ब्राव्होला साथ दिली.