लंडन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला कर्जबुडव्या विजय माल्याने हजेरी लावल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील अनेक बँकांची तब्बल ९ हजार कोटींची कर्जे बुडवून विजय माल्ल्या फरार आहे. त्यांने इंग्लंडमध्ये आसरा घेतलाय. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला माल्ल्याने हजेरी लावल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. माल्याच्या या उपस्थितीमुळे आश्चार्य व्यक्त होत आहे.


मानवी तस्करी रोखण्यासाठी काम करणाऱ्या जस्टिस अँड केअर या संघटनेतर्फे रविवारी विराट कोहलीच्या उपस्थितीत एका चॅरिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला टीम इंडियातील अनेक सदस्यांबरोबरच प्रसिद्धी व्यक्तीही आल्या होत्या. मात्र, विजय माल्ल्या याठिकाणी आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.