नवी दिल्ली : टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार याच्याऐवजी विजय शंकर याला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. तामिळनाडुतील हा प्लेअर आपल्या राज्याच्या वन-डे टीमचा कॅप्टनही आहे.


बॉलिंग अॅक्शन बदलली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ वर्षीय विजय शंकर हा भलेही फास्ट बॉलर असेल पण, त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा त्याच्या बॉलिंगचा अंदाज काहीसा वेगळाच होता मात्र, नंतर त्याने बॉलिंग बदलली.


विजय शंकर याचे वडील आणि भाऊ हे दोघेही क्रिकेट खेळले आहेत. मात्र, या दोघांना क्रिकेटमध्ये जास्त यश मिळालं नाही. पण, त्या दोघांनी क्रिकेट खेळल्याचा फायदा विजय शंकर याला नक्कीच झाल्याचं दिसत आहे.


स्पिनर म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात


विजय शंकर याने एक स्पिनर म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, नंतर त्याने आपली अॅक्शन बदलत मीडियम फास्टर बॉलर बनला. त्याने आपली बॉलिंग अॅक्शन का आणि कशा प्रकारे बदलली यासंदर्भात विजय शंकरने स्वत: सांगितलं आहे.


राहुल द्रविडने दिला सल्ला


राहुल द्रविडला विजय शंकर आपला आदर्श मानतो. विजयने आपली बॉलिंग अॅक्शन बदलत पहिल्यांदा फास्ट बॉलिंग राहुल द्रविड समोरच केली होती. मात्र, त्यावेळी विजय चिंतेत होता. त्यानंतर राहुल द्रविडने त्याच्याजवळ जात म्हटलं की, "काळजी करु नकोस. मला तुझी बॉलिंग खूपच आवडते, तु फक्त बॉलिंगचा स्पीड आणखीन वाढव."


विजयने म्हटलं की, मी ज्यावेळी तामिळनाडुच्या टीममध्ये खेळत होतो त्यावेळी अनेक प्लेअर्स स्पिन बॉलिंग टाकत होते. त्यावेळी अनेकांनी मला फास्ट बॉलिंग करण्याचा सल्ला दिला होता.


हा प्रकार विजय शंकरसोबत झाला आहे मात्र, क्रिकेट विश्वात असे अनेक सितारे आहेत ज्यांना क्रिकेटमध्ये वेगळी भूमिका निवडायची होती मात्र, केलं आहे वेगळचंय पाहूयात कोण आहेत हे प्लेअर्स...


सचिन तेंडुलकर :


११ वर्षांचा असताना सचिन फास्ट बॉलिंग शिकण्यासाठी अकादमीत गेला होता. मात्र, एक धडाकेबाज बॅट्समन बनत त्याने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.


अनिल कुंबळे :


कुंबळे पूर्वी बॅटिंग आणि मीडियम फास्ट बॉलिंग करत होता. मात्र, नंतर आपली बॉलिंग स्टाईल बदलत तो लेग स्पीनर बनला आणि टेस्ट क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स घेतले.


अॅडम गिलक्रिस्ट :


शालेय जीवनात क्रिकेट खेळण्याची सुरुवात करणारा गिलक्रिस्ट याला फास्ट बॉलर बनायचं होतं. मात्र, तो एक चांगला विकेटकीपर आणि बॅट्समन बनला.


व्हीव्हीएस लक्ष्मण :


आपल्या बॅटिंगच्या जोरावर विरोधी टीमच्या मनात धडकी भरवणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणची २८१ रन्सची इनिंग सर्वांच्याच लक्षात आहे. लक्ष्मणने अंडर-१९ क्रिकेट फास्ट बॉलरच्या रुपात खेळली होती.


आर अश्विन :


टीम इंडियाचा सध्याचा सर्वात यशस्वी स्पिनर असलेला आर अश्विन आपल्या बॉलिंगने सर्वांनाच गारद करतो. मात्र, एक वेळ अशी होती की आर अश्विन आपल्या टीमसाठी ओपनर म्हणून मैदनात उतरत होता.