कोलंबो : बांग्लादेश विरुद्ध खेळाताना टीम इंडियाने तिरंगी मालिकेतील दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला. या  सामन्याचा खरा हीरो अष्टपैलू खेळाडू विजय शंकर ठरला. त्याला हार्दिक पांड्याच्या स्थान देण्यात आले होते. त्यानंतर त्याची हार्दिकशी तुलना होऊ लागली. यावेळी विजय शंकरने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या हा हार्दिक आहे. त्याच्याशी तुलना करणे योग्य नाही. पांड्याशी तुलना करु नका. मी त्याच्याबरोबर बरोबरी करु शकत नाही. मला कोणत्याही दबावाखाली यायचे नाही. मला माझ्या कामगिरीमध्ये अधिक कशी सुधारणा करता येईल, त्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. बांग्लादेशविरुद्ध खेळताना विजयने दोन विकेट घेतल्या. त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.



विजयने म्हटलेय, माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा खास आहे.  त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. हार्दिकबरोबर तुलना करणे योग्य नाही. तो ऑल राऊंडर आहे. मला वाटते जास्त करुन अनेक खेळाडू दुसऱ्या खेळाडूशी तुलना करण्यापेक्षा त्याच्या कामगिरीवर लक्ष देतात. त्यामुळे यापेक्षा चांगले काम कसे होईल, याकडे प्रत्येक खेळाडूचे लक्ष असते.


यावेळी विजय शंकरला एक प्रश्न विचारला गेला.  टीममध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी तू कशा प्रकारची योजना आखली आहेस? याआधीच हार्दिकने आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान, विजयने म्हटलेय आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला जास्तीत जास्त विकेट कशा मिळतीय यावर भर असेल. विकेट मिळत गेल्या की उत्साह वाढतो. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा यानेही विजय शंकरचे कौतुक केले. त्याचा खेळ चांगला उंचावत आहे.