Vinesh Phogat ने CAS समोर सांगितलं 100 ग्रॅम वजन वाढण्याच कारण, `ॲथलीट्स व्हिलेजमध्ये...`
Vinesh Phogat Disqualification case : 100 ग्रॅम वजनामुळे विनेश फोगाटला फायनल मॅचला मुकावं लागलं. तिला सिल्वर मेडल मिळावं यासाठी भारताने CAS धाव घेतली आहे. इथे विनेशाने आपल्या वजन वाढीबद्दल कारण देताना सांगण्यात आलं की...
Vinesh Phogat Disqualification case in Paris Olympics 2024 : भारताची स्टार कुस्तीपटू विनेशा फोगाटला (Vinesh Phogat ) न्याय मिळावा यासाठी अख्खा देश एकवटलाय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला फायनलचा सामन्याला मुकावं लागलं. ती सेमीफायनलसाठी अपात्र ठरल्याने तिच्यासोबत भारतीयाचं गोल्डचं स्वप्न धुळीस मिळालं. अख्खा देशाला तिच्याकडून गोल्ड मेडलची आशा होती. पण 100 ग्रॅम वजनामुळे सर्व खेळ संपुष्टात आला. (Vinesh Phogat Disqualification case Vinesh Phogat told CAS that the reason for gaining 100 grams weight)
फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी तिची मेहनत आणि सेमीफायनलमधील तिचं यश पाहता तिला सेल्वर मेडल मिळावं असं तिच्यासोबत भारतीयांची इच्छा आहे. यासाठी तिने CAS मध्ये धाव घेतली आहे. CAS मध्ये तिचा बाजूने देशातील सर्वाधिक प्रतिष्ठीत आणि विरोधी पक्षाला घाम फोडणारे वकील हरीश साळवे (Harish Salve) मांडत आहेत. CAS (Court of Arbitration for Sports) मध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून 13 ऑगस्टला निर्णय येणार आहे.
100 ग्रॅम वजनाबद्दल काय सांगण्यात आलं?
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, वकील हरीश साळवे यांनी 100 ग्रॅम वजन वाढण्यामागे कारण सांगितलं की, ' कुस्ती स्पर्धेचे ठिकाण असलेल चॅम्प डी मार्स एरिना आणि ॲथलीट्स व्हिलेजमधील अंतर आणि शेड्यूल हे वजन कमी करण्यामागील मुख्य कारण आहे. स्पर्धांमधील त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे विनेशला वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, ज्यामुळे तिला स्पर्धेच्या पहिल्या दिवसानंतर 52.7 किलोमुळे ती निराश होती.'
ते पुढे म्हणाले की, 'विनेशला कोणताही स्पर्धात्मक फायदा मिळाला नाही कारण दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं वजन 100 ग्रॅमने वाढलं होतं, ज्यामुळे तिला कोणताही स्पर्धात्मक फायदा मिळाला नाही.' अहवालात पुढे असं म्हटलंय की, '100 ग्रॅमपेक्षा जास्त वजन नगण्य मानलं जातं. कारण उन्हाळ्याच्या हंगामात मानवी शरीरावर गरमीमुळे सहज सूज येऊ होऊ शकते, कारण उष्णतेमुळे शरीरात अधिक पाणी जमा होतं, वैज्ञानिकदृष्ट्या जगण्याच्या उद्देशाने हे महत्त्वचा मुद्दा आहे. हे स्नायूंच्या वाढीमुळे देखील असू शकतं कारण ऍथलीटने एकाच दिवसात तीन वेळा स्पर्धा खेळल्या आहेत.'
तसंच 'क्रीडापटू त्याचं आरोग्य आणि सचोटी राखण्यासाठी स्पर्धांनंतर खात असलेल्या अन्नामुळे देखील असू हे घडलं असू शकतं.' पणदुसरीकडे वकिलांनी फसवणूक किंवा हेराफेरीची शक्यता फेटाळून लावल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आलंय. वजन वाढण्यामागे अतिरिक्त अन्न खाण्याचा तर्कही नाकारण्यात आलाय.