मुंबई : 24 वर्षापूर्वी क्रिकेटर विनोद कांबळीने एक इतिहास रचला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद कांबळीने जेव्हा हा रेकॉर्ड रचला तेव्हा तो सचिन तेंडुलकरपेक्षा उत्तम खेळाडू आहे अशी चर्चा रंगली होती. 


त्यावेळी विनोद कांबळीप्रमाणे कोणताच खेळाडू होऊ शकला नाही. 13 मार्च 1993 मध्ये विनोद कांबळीने झिम्बावे विरूद्ध खेळून दुसरं दुहेरी शतक केलं होतं. असा रेकॉर्ड रचणारा टीम इंडियातील विनोद कांबळी हा पहिला खेळाडू होता. विनोद कांबळीच्या या रेकॉर्डची बरोबरी आताचा कॅप्टन विराट कोहलीने 2017 मध्ये केली होती. 


कोणता रेकॉर्ड केला कांबळीने 


1993 मध्ये विनोद कांबळीने दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडिअमध्ये दुहेरी शतक केले. या अगोदर कांबळीने इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात पहिलं दुहेरी शतक केलं होतं. या सामन्यात पुढच्या खेळात त्याने आणखी दोन शतक लगावले होते. यामुळेच विनोद कांबळीचे चार टेस्ट मध्ये 136 धावा होत्या. 


असा होता कांबळीचा टेस्ट मॅचचा प्रवास 


कांबळीचं टेस्ट करिअर जास्त मोठं नव्हतं. त्याने आपली पहिली टेस्ट मॅच 1993 मध्ये खेळली आणि अंतिम टेस्ट मॅच 1995 मध्ये न्यूझिलँडमध्ये खेळला. पण आपल्या खेळाच्या सुरूवातीच्या काळात विनोद कांबळीने उत्तम खेळ दाखवून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं होतं. त्याने आतापर्यंत फक्त 17 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यामध्ये 54 च्या रनरेटने 1084 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतक आणि 3 अर्धशतक केले आहेत. 



2017 मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर विराट कोहलीने जवळपास 24 वर्षानंतर एकापाठोपाठ तीन इनिंगमध्ये एक शतक आणि दुहेरी शतक करून विनोद कांबळीचे बरोबर केली आहे.