मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना क्रिकेट पाहायला आवडते. लाईव्ह मॅच पाहाण्यात एक रोमांच असतो. यामध्ये तुम्ही पाहिलं असणार की, पूर्वीपेक्षा आता क्रिकेटच्या मैदानावरील क्षेत्ररक्षणाची पातळी खूप वाढली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते देशांतर्गत क्रिकेटपर्यंत सर्वत्र क्षेत्ररक्षक आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाने संपूर्ण क्रिकेट जगताला चकित करतात. असाच एक व्हिडीओ आपल्याला युरोपियन क्रिकेट लीगमध्ये पाहायला मिळाला आहे. असे म्हटले जाते की, एका कॅचमध्ये देखील सामना पलटण्याची ताकद असते आणि असंच काहीसं झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्यादा तुम्ही हे पाहिलं असेल की, खेळाडू झेल घेतल्यानंतर एकमेकांना मिठी मारतात. तर कधी त्या खेळाडूच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात. परंतु क्रिकेटच्या मैदानावरुन एक असा व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.


या व्हिडीओमध्ये खेळाडूंनी कॅच पकडण्या आधीच एकमेकांना मिठी मारली आणि मग कॅच पकडली. हा व्हिडीओ त्याच्या या युनिकनेसमुळे भलताच व्हायरल झाला आहे.


खेळाडूने मिठी मारून झेल घेतला


युरोपियन क्रिकेट लीगमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अशी कॅच पाहायला मिळाली, जे पाहून सगळेच थक्क झाले. खरे तर या सामन्यात फलंदाजाने चेंडूवर मोठा शॉट खेळला आणि चेंडू बाउंड्री लाईनपर्यंत पोहोचला, हा चेंडू पकडण्यासाठी दोन क्षेत्ररक्षक बाऊंड्रीजवळ अशा प्रकारे आदळले की त्यांनी एकमेकांना मिठी मारली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विशेष बाब म्हणजे एकमेकांवर आदळल्यानंतरही खेळाडूंनी बॉलकडे लक्ष दिले आणि विषेश कॅच घेतली. या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि क्रिकेट प्रेमींना तो खूप आवडला आहे.