viral video: भारतीय संघ आता पुढच्या वर्षी 2023 (ODI World Cup 2023) च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संघामध्ये अनेक बदल करताना दिसला आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये (IndvsNz) तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात आली आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता तिसरा सामना 'करो या मरो' असा असणार आहे. क्रिकेटर्स आणि त्यांच्या मैत्रिणी किंवा पत्नी त्यांच्यासोबत मैदानावर दिसं हे तर साहजिकच झाल आहे.क्रिकेटच्या प्रत्येक दौऱ्यादरम्यान कोणीतरी  क्रिकेटर्स त्यांच्या पत्नीसोबत दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट खेळाडू  युझवेंद्र चहलची (yuzvendra chahal) पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा (dhanshree verma) त्याच्यासोबत जवळपास प्रत्येक मॅचला दिसते... सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर सुद्धा धनश्री त्याचसोबत आहे. (Viral Video shikhar dhawan shares dhanashri verma and chahal )


आणखी वाचा: Health News: सावधान! ऑफिसमध्ये लंच ब्रेकला मायक्रोवेव्हमध्ये डब्बा गरम करताय? येऊ शकते नपुंसकता


शिखर धवन नेहमी  सोशल मीडियावर (social media) ऍक्टिव्ह असतो,   वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचा असतो . 
शिखर धवन च्या प्रत्येक व्हिडिओवर त्याचे चाहते भरपूर लाईक्स करता त्याचे व्हिडीओ आणि पोस्ट खूप मोठ्या प्रमाणात शेरसुद्धा केले जातात. 


सोशल मीडियावर अनेक गोष्टी अश्या वाऱ्यासारख्या व्हायरल होत असतात, सध्या शिखर धवनचा एक  व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून खूप कॉमेंट्स करत आहेत. 


 शिखर धवनने जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात तो युझवेन्द्र चाहलच्या पत्नीविषयी एक अशी गोष्ट बोलून गेला कि, सर्वांच्याच भुवया उंचावल्या... व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो चहल आपल्यासोबत बरच सामान घेऊन चालताना दिसत आहे. (Viral Video shikhar dhawan shares dhanashri verma and chahal)


यावर शिखर धवन म्हणतोय ''चाहूल बायकोचा हमाल झाला आहे, बायकोच ओझं वाहून नेतोय.''   यात मागून धनश्रीसुद्धा येताना दिसत आहे यावर तिची प्रतिक्रिया शिखर तिला विचारतो तेव्हा ती म्हणते '' माझ्या पायाला लागलाय नाहीतर एरव्ही मीच सर्वांचं  सामान उचलत असते'' 
सध्या या व्हिडिओवर लोक खूप कॉमेंट्स करत आहेत . 



धनश्री सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह 


डान्सर आणि युटूबर धनश्री तिच्या डान्सचे नवनवीन व्हिडीओ पोस्ट करत असते त्यावर  लाखो लाईक्स आणि प्रतिक्रिया येत असतात. पायाला दुखापत झाल्यानंतर धनश्री सोशल मीडियापासून लांब होती. मात्र तिने आता पुन्हा कमबॅक केलं आहे.