मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या  निदहास ट्रॉफी स्पर्धेत खेळत नाहीये. तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या सुई धागा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी शूटिंग संपल्यानंतर अनुष्का मुंबईला निघाली. यावेळी विराट कोहली तिला पिकअप करण्यासाठी मुंबई एअरपोर्टला आला होता. 


यादरम्यान रविवारी अभिनेत्री अनुष्काने इन्स्टाग्रामवर विराटसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केलाय. या फोटोत अनुष्का विराटला किस करताना दिसतेय. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.


विराट आणि अनुष्का यांनी गेल्या वर्षी ११ डिसेंबरला इटलीमध्ये जाऊन विवाह केला. रोमँटिक फोटो शेअर करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही जेव्हा विराट द. आफ्रिका दौऱ्यावर होता तेव्हा अनुष्कासोबतचा रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तसेच माझी आणि फक्त माझी असं कॅप्शन लिहिलं होतं. 



 


विराटच्या या फोटोमध्ये दोघांचे चेहरे दिसत नाहीयेत. दोघांनी एकमेकांना मिठी मारलीये. तसेच बॅकग्राऊंडला एक पेंटिंग आहे ज्यात कपल किस करताना दिसतेय.