Gautam Gambhir On Rohit Sharma : टीम इंडियाने आशिया कपच्या (Asia Cup Final) फायनल सामन्यात दणक्यात विजय मिळवला. फक्त 116 मिनिटात टीम इंडियाने श्रीलंकेचा लाजीरवाणा पराभव केला. त्यामुळे आता अनेक देशांनी भारतीय खेळाडूंची धास्ती घेतल्याचं पहायला मिळतंय. आशिया कप जिंकल्यानंतर आता वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. त्याचं प्रेशर वर्ल्ड कपमधील प्रत्येक खेळाडूवर असेल. मात्र, त्याआधी आता वर्ल्ड कप विनर खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मोलाचा सल्ला दिलाय.


काय म्हणाला गौतम गंभीर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवरून कधीच शंका नव्हती. त्याने 5 आयपीएल विजेतेपद पटकावलं आहेत. अनेकांना एकदाही कप जिंकता आला नाही. पण रोहितने करून दाखवलंय. मात्र, आता त्याची खरी परीक्षा ही येत्या 15 दिवसात असणार आहे. त्याला आता येत्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वोत्तम खेळाडू निवडण्याची संधी आहे. 15 ते 18 बेस्ट खेळाडू तो निवडू शकतो. त्याला बेस्ट खेळाडू निवडणं जमलं नाही तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. प्रत्येक विश्वचषकानंतर कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. याचा सामना विराट कोहलीने देखील केलाय, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.


2007 मध्ये राहुल द्रविडने याचा सामना केला होता. जर टीम इंडिया 2023 मध्ये विजय मिळवू शकला नाही तर रोहितच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जातील, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. भारतीय संघात विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची क्षमता आहे, असंही गौतम गंभीर म्हणाला आहे. स्टार स्पोर्ट्सवरील सामन्यानंतर केलेल्या विश्लेषणादरम्यान गौतम गंभीरने हे वक्तव्य केलं आहे. 


आणखी वाचा - मोहम्मद सिराज वेगळ्याच धुंदीत, सामन्यात असं काही केलं की... विराट देखील पोटधरून हसला; पाहा Video


दरम्यान, येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपचा नारळ फुटणार आहे. त्यासाठी आता टीम इंडिया देखील सज्ज झाली आहे. रोहित अँड कंपनीने त्यासाठी कंबर कसली आहे. आम्ही यावेळी वर्ल्ड कप जिंकू, असं म्हणत रोहितने आत्मविश्वास दाखवलाय. आम्ही तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करतोय. सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे यंदा वर्ल्ड कपसाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी जातोय, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.