Virat kohli can't stop laughing : टीम इंडियाच्या दणदणीत विजयासह आता आशिया कप 2023 स्पर्धेची सांगता झाली आहे. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा त्यांच्याच मैदानावर लाजीरवाणा पराभव केला. फायनल (Asia Cup Final) सामन्यात फक्त एक नाव गाजलं... मोहम्मद सिराज. सामन्याच्या 4 थ्या ओव्हरमध्ये थरारक गोलंदाजी करत सिराजने श्रीलंकेचा गाशा गुंडाळला. 40 मिनिटं चालणारा सामना इतक्या लवकर संपेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती मात्र, सिराजने (Mohammed Siraj) करून दाखवलं. फायनल सामन्यात गेम चेंजिंग ठरली मोहम्मद सिराजची दुसरी ओव्हर. पहिली ओव्हर मेडन गेल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराजने कहर केला. मात्र, या सामन्यावेळी मजेशीर घटना घडली.
मोहम्मद सिराजने एकाच ओव्हरमध्ये (Mohammed Siraj thriller 4th Over) चार गडी बाद केले आहे. पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा या चार प्रमुख फलंदाजांना सिराजने डगआऊटमध्ये पाठवलं. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर धनंजया डी सिल्वाने चौकार मारला. डी सिल्वाने मैदानात लेग साईडला हा शॉट खेळल्यामुळे चेंडू अडवण्यासाठी एकही खेळाडू उपस्थित नव्हता. मग काय स्वत: सिराजने सुत्र हातात घेतली अन् बॉलच्या मागे धावू लागला. बॉल काही सापडला नाही. मात्र, पळताना सिराजच्या चेहऱ्यावरची स्माईल सरळं काही सांगत होती.
सिराजच्या ओव्हरमध्ये पहिल्या दोन विकेट्स गेल्यावर 3 स्लिप आणि 1 गली असे खेळाडू स्लीपमध्ये उभे होते. त्यामुळे सिराजने स्वतः हा चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला, पण चौकार गेला अन् विराट कोहलीला (Virat Kohli) हसू आवरलं नाही. एवढी एनर्जी कुठून येते?, असा सवाल कोहलीला नक्की पडला असेल.
Siraj is in some mood today #INDvsSL pic.twitter.com/XM6FnERAO9
— Awadhesh Mishra (@annnnshull) September 17, 2023
आशिया कप फायनल- श्रीलंका प्लेइंग 11: पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.
आशिया कप फायनल- टीम इंडिया प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.