मुंबई : शुक्रवार विराट कोहलीच्या टीमने आर. अश्विनच्या पंजाब टीमचा पराभव केला. बंगळुरुने हा सामना 4 विकेटने जिंकला. या विजयासोबतच बंगळुरुने आपल्या विजयाची सुरुवात केली. पण सामना संपल्यानंतर विराटची एक गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर  व्हायरल होतो आहे. सामना संपताच विराट जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. तेव्हा दर्शकांमध्ये बसलेली अनुष्काला तो पाहू शकत नव्हता. तेव्हा त्याने लगेचच अनुष्काला फोन केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का दिसल्यानंतर विराटने अनुष्काला मागे जाण्याचा इशारा केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्का विराटच्या नेतृत्वातील संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर पोहोचली होती. 



पंजाबने कमी रन केले. त्यामुळे बंगळुरुला सहज विजय मिळवता येईल असं चित्र होतं. पण पंजाबच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत शेवटपर्यंत मॅच जिंकण्य़ाचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आलं. एबी डिविलियर्सने चांगली बॅटींग करत टीमसाठी विजय खेचून आणला.