पृथ्वी शॉचं शतक, विराट कोहलीने असा व्यक्त केला आनंद
विराट कोहलीकडून पृथ्वीचं अभिनंदन
राजकोट : भारत इंडिज यांच्यातील 2 सामन्याच्या टेस्ट सिरीजला आजपासून सुरुवात झाली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉने दमदार शतक ठोकलं आहे. टीम इंडियाच्या टीममध्ये टेस्ट सामन्यांमध्ये पृथ्वी शॉने डेब्यू केलं आहे.
पृथ्वी शॉचा विक्रम
पृथ्वी शॉने 99 बॉलमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. भारताकडून शतक ठोकणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. पृथ्वी शॉच्या शतकनंतर विराट कोहलीने आनंद व्यक्त केला. पवेलियनमध्ये उभं राहून टाळ्या वाजवून विराट आणि टीमच्या सहकाऱ्य़ांनी त्यांचं अभिनंदन केलं.
शतकीय भागीदारी
ओपनिंगला भारताकडून पृथ्वी शॉ आणि केएल राहुल मैदानात उतरले होते. पण के एल राहुल स्वस्तात माघारी गेल्याने भारताला पहिला झटका लवकर लागला. शॉ आणि चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाची इनिंग सांभाळली आणि शतकीय भागीदारी केली. पुजाराने ही 86 रनची खेळी केली.
डेब्यूत सामन्यात सर्वात कमी बॉलमध्ये शतक
शिखर धवन - 85 बॉलमध्ये शतक - ऑस्ट्रेलिया, मोहाली, 2013
ड्वेन स्मिथ - 93 बॉलमध्ये शतक - दक्षिण आफ्रिका, केपटाउन, 2004
पृथ्वी शॉ - 99 बॉलमध्ये शतक - वेस्टइंडिज, राजकोट, 2018