दुबई : आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत विराट कोहली खाली घसरला आहे. भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज  मार्नस लाबुशाने आता तिसर्‍या क्रमांकावर आला आहे तर विराट कोहली चौथ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पहिल्या तर स्टीव्ह स्मिथ दुसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या दहा फलंदाजांविषयी बोलायचे झाले तर विराटशिवाय भारताचा चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी आहे. पुजारा सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे. त्याशिवाय अजिंक्य रहाणेनेही एक स्थान वर मिळवले असून नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळला होता आणि तीन कसोटी सामन्यांमध्ये तो संघाचा भाग नव्हता, त्यामुळे त्याला क्रमवारीत फटका बसला. लाबूशाने याने चार सामन्यात 53.25 च्या सरासरीने 426 धावा केल्या. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने चार सामन्यांत 313 धावा केल्या. फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणार्‍या रूटने श्रीलंकेविरुद्ध शानदार फलंदाजी करत दोन कसोटी सामन्यांत 400 पेक्षा जास्त धावा केल्या. तर बाबर आजम सातव्या क्रमांकावर आहे.



कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचं झालं तर आर अश्विन आठव्या आणि जसप्रीत बुमराह नवव्या स्थानी आहे. पॅट कमिंग पहिल्या क्रमांकावर तर स्टुअर्ट ब्रॉड दुसर्‍या क्रमांकावर आहे. जेम्स अँडरसन सहाव्या स्थानावर आहे.