विराट कोहलीने धोनीला टाकलं मागे
विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने परदेशात आतापर्यंत ७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीला मागे टाकत दुसऱ्या देशात सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या टीमने दुसऱ्या देशात जाऊन १३ सामने खेळले. ज्यामध्ये ७ सामने जिंकले.
कोलंबो : विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने परदेशात आतापर्यंत ७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीला मागे टाकत दुसऱ्या देशात सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या टीमने दुसऱ्या देशात जाऊन १३ सामने खेळले. ज्यामध्ये ७ सामने जिंकले.
धोनी कर्णधार असतांना भारताने परदेशात ३० सामने खेळले ज्यामध्ये ६ सामने जिंकले. विराटने दुसऱ्या देशाच्या धरतीवर करिअरच्या १२ व्या मॅचमध्ये धोनीची बरोबरी केली होती. परदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा रेकॉर्ड गांगुलीच्या नावावर आहे. गांगुली कर्णधार असतांना भारताने ११ सामने जिंकले होते.