यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचं सगळ्यात खराब रेकॉर्ड
यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफमधून विराट कोहलीची बंगळुरू टीम बाहेर पडली आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफमधून विराट कोहलीची बंगळुरू टीम बाहेर पडली आहे. शनिवारी राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा ३० रननी पराभव झाला. दिल्लीनंतर प्ले ऑफमधून बाहेर पडणारी बंगळुरू ही दुसरी टीम आहे. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससारखे दिग्गज बॅट्समन असूनही बंगळुरूची या मोसमातली कामगिरी निराशाजनक झाली. बंगळुरूची बॉलिंग आणि फिल्डिंग जवळपास प्रत्येक मॅचमध्ये फ्लॉप होती पण शेवटच्या मॅचमध्ये बंगळुरूची मधली फळीही अपयशी ठरली. आयपीएलच्या या मोसमात विराट कोहलीच्या नावावर सगळ्या खराब रेकॉर्डची नोंद झाली आहे. विराट कोहलीची विकेट घेण्याचं स्वप्न प्रत्येक बॉलर बघतो. पण यंदाच्या आयपीएलमध्ये विराटनं स्पिनर्सना विकेट घेण्याची भरपूर संधी दिली. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली ११ वेळा आऊट झाला. यापैकी ८ वेळा त्याची विकेट स्पिनर्सनी घेतली. याआधीच्या कोणत्याही मोसमात स्पिनरनं एवढेवेळा विराट कोहलीची विकेट घेतलेली नाही.
राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली फक्त ४ रन करुन आऊट झाला. मॅचच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये ऑफ स्पिनर कृष्णप्पा गौतमनं विराटला बोल्ड केलं. विराटशिवाय बेन स्टोक्स आणि लोकेश राहुलही ७-७वेळा स्पिनरची शिकार झाले आहेत. विराटनं यावर्षीच्या आयपीएलमध्ये एकूण १४ मॅच खेळल्या. यामध्ये त्यानं ४८.१८ च्या सरासरीनं ५३० रन केल्या आहे. विराटचा सर्वाधिक स्कोअर नाबाद ९२ होता.
विराटला सातव्यांदा हैदराबादविरुद्ध खेळताना अफगाणिस्तानचा स्पिनर राशीद खाननं बोल्ड केलं.
सहाव्यांदा दिल्लीविरुद्ध खेळताना विराटला अमित मिश्राच्या बॉलिंगवर ऋषभ पंतनं कॅच आऊट केलं.
पाचव्यांदा हैदराबादविरुद्ध खेळताना शाकिब अल हससनं विराटची विकेट घेतली. युसुफ पठाणनं विराटचा कॅच घेतला.
चौथ्यांदा चेन्नईविरुद्ध खेळताना विराटला रविंद्र जडेजानं त्याच्या पहिल्याच बॉलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. जडेजानं विराटला बोल्ड केलं होतं.
तिसऱ्यांदा राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये विराटची विकेट श्रेयस गोपाळनं घेतली. डार्सी शॉर्टनं विराटचा कॅच घेतला होता.
दुसऱ्यांदा पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा स्पिनर मुजीब उर रहमाननं विराटला बोल्ड केलं होतं.
पहिल्यांदा कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये विराटनं ऑफ स्पिनर नितीश राणानं विराटची विकेट घेतली होती.