नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली हा जगातील सर्वाधिक मानधन घेणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप-१०० खेळाडूंची यादी फोर्ब्जने बुधवारी जाहीर केली. २०१८साठी असलेल्या या यादीत नाव असलेला विराट हा एकमेव भारतीय ठरला आहे. या यादीत विराट ८३व्या क्रमांकावर आहे. तर, अमेरिकन बॉक्सिंग लेंजड फ्लॉयड मेवेदर हा सर्वात टॉपला आहे. त्याची कमाई १९१३.३ कोटी रूपये इतकी आहे. आश्चर्यकारक गोष्ट अशी की, जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकाही महिला खेळाडूचे नाव नाही. फोर्ब्ज हे एक जगप्रसिद्ध मासिक आहे. हे मासिक वेळोवेळी अनेक सर्व्हे करून निष्कर्ष जाहीर करते. हे निष्कर्षाला जगभरात मान्यता मिळालेली असते.


विराट कोलहीची संपत्ती किती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीची कमाई १६१ कोटी इतकी आहे. यात २७ कोटी रूपयांचा पगार (विजेता बक्षीस रकमेचाही समावेश) आहे. तर १३४ कोटी रूपयांचे उत्पन्न तर तो केवळ जाहीरातींमधूनच घेतो. विशेष असे की, या यादीत समावेश होणार विराट हा केवळ एकमेव क्रिकेटरच नव्हे तर, एकमेव भारतीयही आहे. फोर्ब्सने म्हटले आहे की, 'कोहलीची सर्वाधीक कमाई ही मैदानाबाहेरची आहे. ज्यात प्यूमा, पेप्सी, ऑडी आणि ओकले सारख्या बड्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या मानधनाचा समावेश आहे.'


१०० जणाच्या यादीत एकही महिला नाही


फोर्ब्जने म्हटले आहे की, महिला टेनिस स्टार ली ना, मारिया शारापोव्हा आणि सेरेना विल्यम्स या यादीत नेहमी असत. पण, ली ने २०१४मध्ये निवृत्ती घेतली. शारापोव्हा डोपींग प्रकरणात १५ महिन्यांसाठी निलंबीत झाली. सेरेनाने सप्टेबर महिन्यात बाळाला जन्म दिला. त्यामुळे या मंडळींच्या या यादीत समावेशाला मर्यादा आल्या. महत्त्वाचे असे की, या यादीत सर्वात अधिक बास्केटबॉल खेळाडूंचा (४०) समावेश आहे. यापैकी सर्वाधिक १८ अमेरिकन फुटबॉल तर, १४ बेसबॉल खेळाडू आहेत. 


कोण कितव्या स्थानावर?


मेवेदरनंतर दुसऱ्या क्रमांकावर अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लियोनेल मोसी आहे. त्याची वार्षिक कमाई ७४४.२ कोटी रूपये इतकी आहे. तर, ७२४.२ कोटी कमावणारा पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेवेदरसोबतची फाईट हालल्यानंतर मिक्स्ड मार्शल आर्ट्स चॅम्पीयन मकग्रेगर चौथ्या क्रमांकावर आहे. तर, ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार ज्यूनिअर ५व्या स्थानावर आहे. या यादीत लेजंड रॉजर फेडरर सह ४ टेनिस खेळाडूंचाही समावेश आहे. हे सर्व पुरूष खेळाडू आहेत. 


कोणत्या खेळातून किती खेळाडू


या यादीत बास्केटबॉलमधून ४०, अमेरिकन फुटबॉल १८, बेसबॉल १४, यासोबतच फुटबॉलमधून ९, गोल्फ ५, बॉक्सिंग मधून ४, टेनिस मधून ४ आणि ऑटो रेसंगमधून ४ खेळाडू आहेत. दरम्यान, क्रिकेट  मिक्स्ड मार्शल आर्ट्स आणि ट्रॅक अॅण्ड फील्ड (उसैन बोल्ड) या क्रीडा प्रकारातून प्रत्येकी एक खेळाडूचा समावेश आहे.