नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे विवाहबंधनात अडकले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट-अनुष्का यांचा विवाहसोहळा इटलीमध्ये पार पडला. इटलीतील एका प्रसिद्ध आणि महागड्या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. पाहूयात हा रिसॉर्ट आहे तरी कसा. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, इटलीमधील बोर्गो फिनोकच्योतो रिसॉर्टमध्ये विराट-अनुष्काचा विवाह सोहळा पार पडला. 


हे रिसॉर्ट इटलीतील मिलान शहाराजवळ आहे. फोर्ब्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार, बोर्गो फिनोकच्योतो रिसॉर्ट लग्नसमारंभांसाठी जगभरातील टॉप २० रिसॉर्टपैकी एक आहे.



जगातील दुसऱ्या क्रमांकाचं रिसॉर्ट


फोर्ब्सच्या यादीत बोर्गो फिनोकच्योतो रिसॉर्ट हे खर्चाच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं रिसॉर्ट आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, इटलीमध्ये झालेल्या या शानदार विवाहसोहळ्यात काही ठराविक पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. 


रिसॉर्टमध्ये केवळ २२ खोल्या


बोर्गो फिनोकच्योतो रिसॉर्टमध्ये केवळ २२ रुम्स आहेत. तसेच या ठिकाणी केवळ ४४ लोकं राहू शकतात अशी माहितीही समोर आली आहे.



वाइनयार्ड डेस्टिनेशन


बोर्गो फिनोकच्योतो रिसॉर्ट एक वाइनयार्ड आहे. या ठिकाणी द्राक्षांची शेती होती. काही दिवसांपूर्वी अनुष्काने आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, मला वाइनयार्ड डेस्टिनेशनवर माझं लग्न करायचं आहे. त्यामुळेच या ठिकाणाची निवड करण्यात आली असावी असं म्हटलं जात आहे.


कोट्यावधींचा खर्च


फोर्ब्सच्या मते, या रिसॉर्टमध्ये एका रुमचा आठवड्याचा खर्च १,४७,३१२ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ९८ लाख रुपये आहे. त्यानुसार, एका रुमचा एका दिवसाचा खर्च जवळपास १४ लाख रुपये होतो. रिसॉर्टमध्ये २२ रुम्स आहेत. त्यामुळे एका दिवसासाठी रिसॉर्टचा खर्च हा जवळपास ३ कोटी ८ लाख रुपये आहे.