Virat Kohli Anushka Sharma's net worth : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्यांदा पालक झाल्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. 15 फेब्रुवारी रोजी त्यांचा मुलगा अकायचा जन्म झाला. त्या आधी त्यांना एक मुलगी असून वामिका असं तिचं नावं आहे. तुम्हाला माहितीये का की विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती किती आहे. सध्या सोशल मीडियावर या गोष्टीची चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का आणि विराट 2017 मध्ये लग्न बंधनात अडकले. त्या दोघांच्या लग्नातील कुटुंबातील सदस्य आणि जवळचे काही मित्र उपस्थित होते. त्यानंतरही त्या दोघांनी त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. त्या दोघांना त्यांच्या आयुष्यात प्रायव्हसी आवडते. चला तर जाणून घेऊया विराट आणि अनुष्काच्या नेटवर्थविषयी...


रिपोर्ट्सनुसार, विराटची एकूण नेटवर्थ ही 1053 कोटी पेक्षा जास्त आहे. विराटनं गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगली कमाई केली आणि त्याची नेटवर्थ ही वाढत चालली आहे. 2015 मध्ये त्याची नेटवर्थ जवळपास 289 कोटी होती. गेल्या 9 वर्षात त्यांच्या नेटवर्थमध्ये 264 टक्के वाढ झाली आहे. त्याची नेटवर्थ ही 1053 कोटी असली तरी त्याची सगळ्यात जास्त कमाई ही BCCI नं होतं. BCCI दरवर्षी त्याला कॉन्ट्रॅक्ट A ग्रेड प्लेयरनुसार जवळपास 7 कोटी वर्षाचा पगार म्हणून देते. त्याशिवाय तो अनेक कमर्शियल जाहिराती करताना दिसतो. त्यासाठी तो 7 ते 10 कोटी मानधन घेतो. 



दरम्यान, Royal Challengers Bangalore (आरसीबी) च्या बाजूनं खेळणारा विराट कोहली या आयपीएल टीमकडून जवळपास 15 कोटींची कमाई करतो. Sportskeeda च्या रिपोर्ट्सनुसार, विराट दरवर्षी 145 कोटी कमावतो. 


हेही वाचा : शाहिद कपूरसोबत झालं मोए -मोए! करीनानं अभिनेत्याकडे केलं दुर्लक्ष


दुसरीकडे अनुष्का शर्माविषयी बोलायचे झाले तर Moneymint नुसार, तिची नेटवर्थ ही 306 कोटी आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्काची एकूण नेटवर्थ ही 1359 कोटी पेक्षा जास्त आहे. तर त्या दोघांच्या एकूण संपत्तीतील 22.5 टक्के भाग हा अनुष्काचा आहे. रिपोर्ट्सनुसार, अनुष्का एका चित्रपटासाठी 12 ते 15 कोटी मानधन घेते. Forbes नुसार, 2019 मध्ये तिचं वार्षिक उत्पन्न हे 28.67 कोटी होतं. 


विराट अनुष्काची प्रॉपर्टी!


Mens XP च्या रिपोर्टनुसार, मुंबईच्या वरळीमध्ये विराट- अनुष्काचा सी-फेसिंग अपार्टमेंच आहे. त्याची किंमत 34 कोटी आहे. त्यात इन-हाउस जिम आणि टेरेस आहे. 7700 स्क्वेअर फीट इतका त्याचा एरिया आहे. त्याशिवाय गुरुग्रामच्या DLF-Phase 1 मध्ये त्यांचा एक आलिशान बंगला आहे. त्याची किंमत 80 कोटी रुपये आहे. अलिबागमध्ये 8 एकरमध्ये असलेला आलिशान व्हिला देखील आहे. हा व्हिला त्यांनी 19 कोटींना खरेदी केला होता.